SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकर्‍यांनो! बँक खातं चेक करा, आता कोणत्याही वेळी खात्यात जमा होऊ शकतात पैसे..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या देशातील कोट्यवधीं शेतकऱ्यांची वाट बघणं जवळजवळ संपलं आहे.

कारण एप्रिल महिन्यात काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आठव्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Advertisement

कालच 1 एप्रिलपासून एप्रिल महिनादेखील सुरू झाला आहे आणि सोबतच आर्थिक वर्षाची सुरुवातही झाली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचे सात हप्ते दिले आहेत. या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना सरकारने सहा हजार रुपये दिले आहेत.

तुम्ही तुमचं बँकेचं खातं कोणत्या पद्धतीने चेक करू शकता, एकदा पाहून घ्या..

Advertisement

आता आपण कधीही आपलं खातं चेक करू शकता. यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत किती हप्ते प्राप्त करुन घेऊ शकता? कोणता हप्ता अजून बाकी आहे? हप्ता रखडला असल्यास त्याचं कारण काय किंवा हप्ता का आला नाही या समस्यांचं निराकरण करून पुढील हप्ता मिळवू शकता.

खातं चेक करण्यासाठी…

Advertisement

▪️ सर्वप्रथम, तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा 👉 https://pmkisan.gov.in/

▪️ या वेबसाईटवर तुम्हाला उजव्या बाजूला ( Farmers Corner ) फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.

Advertisement

▪️ या ठिकाणी (Beneficiary Status) या ऑप्शन वर क्लीक केल्यांनतर नवीन पेज उघडेल.

▪️ या नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबरमधील पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.

Advertisement

▪️ या तीन क्रमांकाद्वारे आपण आपल्या खात्यात पैसे आलेत की नाही ते तपासू शकता.

▪️ तुम्ही ज्या पर्यायाला निवडले आहे त्यावर तुमचा नंबर प्रविष्ट करा. यांनतर (Get Data) या ऑप्शनवर क्लिक करा.

Advertisement

▪️ येथे क्लिक केल्यानंतर आपणास सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.

▪️ जर तुम्हाला ‘FTO is generated and Payment confirmation is pending’ असं लिहिलेलं आढळलं तर याचा अर्थ असा आहे की निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसात हप्ता तुमच्या खात्यावर वर्ग केला जाईल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement