फायदे की बात: शेअर मार्केट मध्ये टाटा मोटर्स वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज, ‘या’ कारणामुळे ठरू शकते टॉपची कंपनी..
टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीकडे सरकार, सामान्य माणूस, तसेच शेअर्स मार्केटचेही लक्ष लागलेले असते. जगभरात या कंपनीचा विस्तार असल्याने तेथील उद्योजकांचेही डोळे लागलेले असतात.
टाटा मोटर्स कंपनीने मार्च महिन्यात 66,609 वाहनांची विक्री केली आहे, ही आकडेवारी देशातील आहे. गेल्या वर्षी ऑटो कंपनीने 11,012 कारची विक्री होती.
महिनाभरात 40,609 वाहने विकली गेली. टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल्स बिझिनेस युनिटचे अध्यक्ष गिरीश वाघ म्हणतात, “इलेक्ट्रॉनिक घटकांच्या पुरवठ्याबाबत उपलब्धता सुधारीत आहोत.” गेल्या महिन्यात टाटाच्या 29,654 प्रवासी वाहनांची विक्री झाली.
मार्च 2020 मध्ये कंपनीने 5,676 वाहनांची विक्री केली. टाटा सफारीला बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्च आणि चौथ्या तिमाहीत कंपनीची 9 वर्षांतील सर्वाधिक विक्री झाली.
टाटाच्या सर्वच शेअर्सकडे लक्ष
टाटाच्या वाहनांची विक्री झाल्याने या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. प्रत्येकजण त्याकडे अगोदरपासूनच डोळे लावून बसला आहे. इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांमध्ये टाटा उतरले असल्याने या शेअर्सला चढा भाव मिळण्याची शक्यता आहे. सध्या टाटा शेअर्स 307 रूपयांच्या दरम्यान आहे. तो 357 पर्यंत गेला होता. यापुढेही तो तेजी दाखवण्याची चिन्हे आहेत. टीसीएस, टाटा पॉवर, टाटा स्टील या शेअर्सलाही चढा भाव आहे.
मारुती सुझुकीचेही उड्डाण
मारुती सुझुकी इंडियाची 1,67,014 वाहनांची विक्री झाली. ही देशातील सर्वांत मोठी वाहन उद्योगातील कंपनी आहे. आतापर्यंतचा हा वाहनविक्रीचा उच्चांक आहे. एकंदरीत भारतीय बाजारात मारुती सुझुकीने विक्रीत उड्डाणच घेतले आहे. कोविडच्या काळात कंपनीच्या उत्पादन आणि विक्रीतही घट झाली होती.