अजय देवगणने खरंच मार खाल्ला का? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ विषयी अजय देवगणच्या प्रवक्त्याने दिली ‘ही’ माहिती!
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे कृषी कायद्यांच्या विरोधात आहे. हे कायदे रद्द करावेत म्हणून पंजाब आणि हरियाणा चे शेतकरी जिवाचा आटापिटा करून सरकारकडे आपल्या मागण्या मांडत आहेत.
मात्र, या सगळ्यात आपल्याला आपल्या प्रदेशातील मोठ्या लोकांनी समर्थन द्यावे, असे वाटत असताना बॉलिवूड मध्ये मोठ्या स्थानावर असणाऱ्या काही सेलिब्रिटींनी त्यांच्या या चळवळीला समर्थन दिले तर, काहींनी कोरोना काळ असताना अशा प्रकारे आंदोलन करण्याला विरोध दर्शवला.
जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ची मंडळी या विषयात लक्ष घालायला लागली तेव्हा, अजय देवगण हा अभिनेता देखील स्वतःच्या देशाच्या बाजूने उभा राहिला!
देशाचे सार्वभौमत्व, आणि आपण देश म्हणून कसे एक आहोत, यावर त्याने ट्विट करत, देशातील गोष्टींवर इतरांनी बोलू नये असा मुद्दा मांडला. यावरून त्याला शेतकरी विरोधक ठरवण्यात आले.
त्याने देशाची बाजू जशी मांडली तशी शेतकऱ्यांची मांडायला हवी होती असा सूर शेतकरी नेत्यांमधून उमटला. त्याच्यावर सतत टीका देखील सुरू झाली.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिल्लीच्या एका पबच्या बाहेर अजय देवगणला लोक कृषी कायद्याविरोधात न बोलल्यामुळे किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलल्यामुळे मारहाण करत असल्याची क्लिप सगळीकडे फिरत आहे.
Bollywood Actor #ajaydevgan was drunk and #Beaten badly by some youngsters in Delhi outside a #night_club.
what’s truth behind this video please check.#ViralVideo #अजय_देवगन #delhi pic.twitter.com/IuZ1ydON0H— Rajan Tyagi (@rajanlive_etv) March 29, 2021
Advertisement
यावर अनेक मिडीया मधून तो अजय असल्याची चर्चा सुरू होती. बऱ्याच न्यूज चैनलने जेव्हा शहानिशा करण्यासाठी त्याच्याकडे फोन केला तेव्हा, त्याच्या प्रवक्त्याने एक महत्त्वाची बातमी दिली आहे. यानुसार, त्यावेळी होती ती व्यक्ती अजय देवगण नसून माध्यमांनी अशा चुकीच्या बातम्या देण्याआधी एकदा शहानिशा करून घ्यावी, असे सांगितले आहे.
अजय देवगण प्रतिष्ठित नागरिक असून समाजात वावरताना आपल्या कडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही किंवा आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही याची ते काळजी घेतात, आणि म्हणूनच या खोट्या व्हिडिओ विषयी बातम्या पसरवू नयेत अशी विनंती देखील प्रवक्त्याने केली आहे.
या व्हिडिओमध्ये अजय देवगण चा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मात्र, तो व्यक्ती अजयच असल्याचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रवक्त्याने अजय दिल्लीला गेल्या 14 महिन्यापासून गेलेला नसून त्याच्या हातात असलेल्या तीन- चार चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्यात तो सध्या खूप व्यस्त आहे, असेही सांगितले.