SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवीन घर खरेदी करायचंय? मग ‘इतके’ टक्के मुद्रांक शुल्क भरावं लागणार; सरकारचा मोठा निर्णय

मार्चं एंड आला की व्यापारी किंवा सीए लोकांचीच पळापळ होते असे नाही तर कॉमन मॅनही या धबाडग्यात पिसला जातो. दुसऱ्या दिवसापासून आर्थिक वर्ष सुरू होणार असल्याने ही धावपळ असते.

रेडीरेकनरचे दरही वाढतात, त्यामुळे लोकांच्या मनात धाकधूक होती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुद्रांक शुल्क आणि रेडिरेकनरविषयी मोठी घोषणा केली आहे. रेडिरेकनरचे दर मात्र, जसेच्या तसे ठेवले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

कोरोनाच्या कालावधीत सरकारने तब्बल मुद्रांक शुल्काबाबत कपात केली होती. राज्यात मुद्रांक शुल्कातील सवलतीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे घर खरेदीदारांच्या खिशाला तोशिस लागणार आहे.

पाच टक्के भरावे लागेल शुल्क –

Advertisement

यापुढे म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून घर खरेदीसाठी 5% मुद्रांक शुल्क भरावं लागेल. कोरोनाची स्थिती फारशी बदलेली नाही. त्यात पुन्हा लॉकाडाऊन लागण्याची शक्यता असल्याने खरेदीदारांमध्ये धास्ती आहे. खरे तर सरकार मुद्रांक शुल्क वाढवणार नाही, असे वाटत होते. परंतु सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.

महसूलमंत्री थोरात मुदतवाढ देण्याच्या मानसिकतेत होते. त्यांनी तसा प्रस्तावही पाठवला होता. परंतु अर्थ खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. आता खरेदीसाठी 5 टक्के मुद्रांक शुल्क लागेल.

Advertisement

कोरोनामुळे ठप्प असलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये 2 टक्के सवलत दिली होती. डिसेंबर 2020 पर्यंत 3 टक्के सवलत दिली होती. त्यानंतर मार्चपर्यंत 2 टक्के सवलत देण्यात आली होती. पण आता ही सवलत रद्द केली गेली असून आता पूर्ण 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

प्रत्येक घर महिलेच्याच नावे करावं लागेल

Advertisement

महिलांच्या नावे घर घेतल्यास 1 टक्का सवलत मिळेल. अर्थ मंत्री अजित पवार यांनी बजेटमध्येच तशी घोषणा केली होती. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी नावाची ही योजना आहे. यापुढे कोणतंही घर घेतलं तर त्याची नोंदणी घरातील महिलेच्याच नावे होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement