SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📌 दिवसभरातील घडामोडींचा थेट आढावा

◼️लॉकडाऊन लावून जीवन उध्वस्त करू नका म्हणत, पुण्यातील पाथारी व्यावसायिक आणि कष्टकरी संघटनांनी दर्शवला लॉकडाऊनला विरोध!

◼️सैफ अली खान आणि अमृता सिंह चा मुलगा इब्राहिम करणार बॉलिवूड मध्ये पदार्पण; करण जोहर साठी करणार ‘असिस्टंट डिरेक्टर’ म्हणून काम!

Advertisement

◼️वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे घाटी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेत, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी करण्याच्या दिल्या सूचना

◼️महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य; प्रत्येक प्रवाशाच्या चाचणीला 72 तासाची वैधता देत कर्नाटक सरकारकडून सूचना जारी

Advertisement

◼️38 वर्षीय करोनाबाधित रुग्णाकडून उपचारांसाठी रुग्णालयात जागा मिळत नसल्याने ऑक्सिजन मास्क लावत नाशिक महापालिकेसमोर धरणे आंदोलन; एका तासाच्या आंदोलनानंतर सरकारी दवाखान्यात मिळाला बेड मात्र ऑक्सिजन पातळी 40 टक्क्यावर गेल्याने गमवावा लागला जीव!

◼️ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांना ब्लड कँसर; मुलगा सिकंदर आणि अनुपम यांनी दिली माहिती!

Advertisement

◼️ मुंबईमध्ये उद्यापासून कोरोना विषयक निर्बंध आणखी सक्तीचे करण्याची महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून शक्यता व्यक्त; मॉल, थिएटर, धार्मिक स्थळे राहू शकतात बंद, खाजगी नोकऱ्या 50% उपस्थितीत तर दुकाने उघडायला एक दिवसाआड परवानगी!

◼️ मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या डायरीतून त्यांच्यासाठी लाखोंची वसुली करणारा चेहरा समोर; बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदे असे आहे इसमाचे नाव

Advertisement

◼️अश्लील व्हिडिओ करत वर्षभर अत्याचार, शरद पवारांची भीती दाखवत धमकावले; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर पीडित महिलेचा लैंगिक अत्याचाराचा आरोप

◼️दिया मिर्झाकडे गुडन्यूज; स्वतः सोशल मीडियावर दिली चाहत्यांना नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी, मागच्याच महिन्यात बांधली आहे वैभव रेखी सोबत लग्नगाठ!

Advertisement