SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरगुती गॅस सिलिंडर झाले स्वस्त, पाहा आता आहे ‘एवढी’ किंमत..

गेल्या काही महिन्यांत घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतींनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. घरगुती गॅस सिलिंडर अर्थात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपये प्रति सिलिंडरची कपात करण्यात आलीय.

कमी झालेल्या किंमती काल मध्यरात्री 12.00 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. यावरून आधीपेक्षा कमी किंमतीत एलपीजी सिलिंडर मिळू शकणार आहे. याबाबतची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

कोरोनाचा फैलाव काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा अधिक वेगाने होत असून या काळात देशातील जनता आरोग्यासोबतच महागाईचाही मार सहन करत आहे. यासोबतच पेट्रोल-डिझेलचे भाव ही आभाळाला भिडलेले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवे रेकॉर्ड केलेले असतानाच आता घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमतींनी लोकांच्या चिंतेत आणखी भर टाकली होती. गेल्या 2 महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत जवळपास 8 रुपयांनी वाढ झाली होती, तर एलपीजी गॅसमध्ये तब्बल 125 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.

Advertisement

खरं सांगायचं झालं तर गेल्या काही महिन्यांत तब्बल 6 वेळा गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. 1 जानेवारी 2021 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती ती किंमत 1 मार्च 2021 पर्यंत ही 819रुपायांवर पोहचली होती. म्हणजेच याचा अर्थ असा की, सामान्यांना झळ लावणारे हे दर 2 महिन्यांत प्रचंड वाढले, सोबत प्रती सिलिंडर दरात 125 रुपयांहून अधिक वाढ झाली होती. पण आता ही किंमत 10 रुपयांनी कमी झाल्याने काही वेळेपुरता का होईना लोकांना दिलासा मिळाला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement