महाराष्ट्रात कोरोना चाचणीच्या दरात आणखी कपात करून सुधारित कोरोना चाचणी दर जाहीर करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहे.
यापुढे कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये द्यावे लागणार आहेत. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
शासन निर्णयानुसार, आता कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.
नवीन दर खालीलप्रमाणे :
▪️ अँटिबॉडीजसाठी (एलिसा फॉर सार्स कोविड) 250, 300 व 400 असे दर आहेत.
▪️ सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटिबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर आहेत.
▪️ रॅपिड अँटिजन टेस्टसाठी रुग्ण लॅबमध्ये आल्यास 150, 200 व 300 रुपये
▪️ संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व गोष्टींसाठी 500 रुपये
▪️ रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवालासाठी 600 रुपये
▪️ रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit