आधार क्रमांक पॅन क्रमांकाला लिंक करण्यासाठी काल देशभरात नागरिकांची झुंबड उडाली होती. प्रत्येक जण आपापल्या मित्रांना कोणती साईट आहे, एसएमएस कोणत्या नंबरला पाठवायचा. नेमकी प्रोसेस काय आहे, असे विचारत होता.
काही जणांनी तर एजंटांचा आधार घेतला. त्यांनीही शंभर रूपयांपर्यंत चार्ज घेतला. एवढं असूनही केंद्र सरकारची ती साईट कासवछाप झाली. एवढ्या प्रमाणात लोकांनी त्यावर उड्या टाकल्याने ती मंदावली. त्यामुळे तर लोकांचा जीव आणखीच टांगणीला लागला.
आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख दिली होती. त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला होता. आयकर विभागाने सोशल मीडिया हॅन्डलवरून मुदतवाढ दिल्याचे जाहीर केलं. तब्बल तीन महिने ही मुदतवाढ मिळाली आहे.
मुदतवाढ देताना कोविडचे कारण पुढे केले आहे. आता ही मुदत 31 मार्च 2021 ऐवजी आता 30 जून 2021 पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.
काल शेवटच्या दिवशी सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्र आणि इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी पॅनकार्ड आधार जोडणीसाठी मोठी गर्दी केली होती. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी आयकर विभागाची साईट सर्च केली. त्यामुळे त्यांचा सर्व्हर काम करेना झाला. त्यामुळे अनेकांना पॅन लिंक करता आले नाही. परिणामी अनेकांच्या पदरी निराशाच पडली.
लोकसभेत ‘वित्त विधेयक 2021’ संमत करण्यात आलं. यामध्ये ‘आयकर कायदा 1961’ मध्ये नव्या कलम 234 एचची तरतूद केली होती. पॅन आधारला लिंक नसेल तर हजार रुपयांपर्यंतच दंड होणार होता. जोडणी न करणाऱ्याचे पॅनही निष्क्रिय होणार होते. परंतु ती बलामत मुदतवाढी आता टळणार आहे. यापूर्वी सरकारने तीन वर्षे मुदत दिली होती. त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit