SpreadIt News | Digital Newspaper

बारावीच्या विद्यार्थ्यांनो ‘असं’ डाउनलोड करा हॉल तिकीट..

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेला बसलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे.

Advertisement

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ऑनलाइन हॉल तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंडळाचे संकेतस्थळ: www.mahasscboard.in यावर विद्यार्थी त्यांचे हॉल तिकीट घेऊ शकतात असे निवेदन देखील बोर्डाकडून आले आहे.

Advertisement

हॉल तिकीट बाबत सूचना

▪️सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन हॉलतिकिट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत.

Advertisement

▪️प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.

▪️प्रिंटवर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यावी.

Advertisement

▪️हॉलतिकिटामध्ये विषय, माध्यम बदल असेल दुरुस्तीकरता कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जावे.

▪️हॉलतिकिट हरवल्यास झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने डुप्लिकेट असा शेरा द्यावा.

Advertisement

दरम्यान, हॉलतिकिटबाबत काही तांत्रिक अडचण सोडवण्याची गरज भासल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement