Take a fresh look at your lifestyle.

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ बुधवार, 31 मार्च 2021

मेष – कामात द्विधावस्था आड आणू नका. मानसिक समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. मैत्रीचे संबंध दृढ होतील. कामाची योग्य पावती मिळेल. प्रवास जपून करावा.

Advertisement

वृषभ – मुलांची खिलाडुवृत्ती वाढेल. चौकसपणे विचार करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. गैरसमजाला मनात थारा देवू नका.

मिथुन – घरातील वातावरण खेळकर राहील. वादाचे मुद्दे बाजूला सारावेत. घरातील कामात अधिक वेळ जाईल.

Advertisement

कर्क – जवळच्या सहलीला जाल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. छंद जोपासता येईल. विविध विषयात रुची दाखवाल.

सिंह – आवडीची कामे कराल. घरातील वातावरण आनंदी ठेवाल. बौद्धिक क्षमता दाखवता येईल. आपल्या आवडीबाबत आग्रही राहाल.

Advertisement

कन्या – दिवस मजेत घालवाल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका.

तूळ – वैचारिक हटवादीपणा करू नका. टीकेला सामोरे जावे लागेल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. संयम राखून बोलावे.

Advertisement

वृश्चिक – तुमच्या खटपटी स्वभावाला खतपाणी मिळेल. श्रमाला मागेपुढे पाहू नका. हातातील कामात यश येईल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल.

धनु – शक्तीने कामे कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. उत्तमरित्या परिस्थिती हाताळाल. दिलदार वृत्तीने वागाल.

Advertisement

मकर – उदार मतवादी राहाल. वागण्यात आत्मविश्वास दाखवून द्यावा. काही वेळेस कणखरपणा ठेवावा लागेल. स्वत:चा मान राखाल.

कुंभ – कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. पायाचे विकार बळावू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.

Advertisement

मीन – कलागुण इतरांसमोर सादर करता येतील. तुमच्या मनातील आकांक्षा पूर्ण होतील. मुलांची प्रगती दिसून येईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement

 

Advertisement

Leave a Reply