SpreadIt News | Digital Newspaper

दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ‘या’ विषयात मिळणार वाढीव गुण!

0

कोरोना मुळे शिक्षण क्षेत्रात अनन्यसाधारण बदल झालेले आहेत. दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे प्रश्न निर्माण व्हावेत, अशा पद्धतीचे मागील वर्ष गेले आहे.

त्यांच्या शाळा आणि कॉलेजच्या वेळा, शाळा, कॉलेजेस सुरू होणार की नाही याबाबत चे प्रश्न, त्याच बरोबर परीक्षेचे वेळापत्रक, त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, एक ना दोन अनेक प्रश्न वर्षभर पालकांना आणि विद्यार्थ्यांना सतावत होते.

Advertisement

दहावी मध्ये पारंपारिक विषयांसोबतच चित्रकलेचा विषय देखील ज्यांना आवड आहे ते विद्यार्थी शिकू शकतात, असा पर्याय उपलब्ध असतो. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन परीक्षांच्या स्वरूपात आधी प्रशिक्षण आणि नंतर परीक्षा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना चित्रकलेचे ज्ञान त्यांच्या भविष्यासाठी आणि उपजीविकेसाठी उपयुक्त ठरावे म्हणून दिले जाते. यासाठी त्यांना अतिरिक्त गुण देखील मिळतात. यातून अनेक विद्यार्थी कलेचे शिक्षक म्हणून नावारूपाला आल्याची उदाहरणे देखील आहेत.

कला संचालक राजीव मिश्रा यांनी तंत्रशिक्षण विभागाला दिलेल्या माहितीनुसार, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकलेशी निगडित दोन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळू नयेत अशी माहिती पोहोचवण्यात आली किंबहुना सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश वाढीव गुण न मिळण्याच्या प्रकारात केला .

Advertisement

दहावीमध्ये या दोन परीक्षांना उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातले ज्ञान मिळवल्या बाबत वाढीव गुण दिले जातात. मात्र, राजीव मिश्रा यांच्याकडून गेलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या तंत्रशिक्षण विभागाने देखील या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचे नाकारले व तसे परिपत्रक शासनाकडुन निघाले.

याचा विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने शासन परिपत्रकाची होळी करत आंदोलन केले. याची दखल घेत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी झूम मिटिंगद्वारे राजीव मिश्रा यांना तंत्रशिक्षण विभागाला खोटी माहिती दिल्याबद्दल खडे बोल सुनावले आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा आपल्याला अधिकार नाही असेही ऐकवले.

Advertisement

इंटरमिजिएट ची परीक्षा देखील ऑफलाईन घ्या आणि त्यांना देखील गुण द्या असे सांगितले. त्यामुळे आता एलिमेंटरी, इंटरमिजिएटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्षात वाढीव गुण मिळणार आहेत.

राज्य कला शिक्षक महासंघाने कला शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान व्हावे, म्हणून ही गोष्ट करण्यात आल्याचे त्याचबरोबर कलेचा विषय संपुष्टात यावा म्हणून अशी माहिती पोहोचवण्यात आल्याचे आरोप केले आहेत. उदय सामंत यांनी देखील ज्यांच्या तक्रारी असतील, त्यांनी तंत्रशिक्षण विभागाकडे द्याव्यात त्यावर चौकशी नेमण्यात येईल असेही आश्वासन दिले.

Advertisement