SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अहमदनगरकरांचे टेन्शन वाढले! दिवसभरातील कोरोनाबाधितांची सर्वोच्च संख्या

अहमदनगर: नगर जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. आज तर तब्बल १७०० कोरोनाबाधित आढळले. हा स्पीड जर असाच चालत राहिला तर नगरमध्ये लॉकडाउन अटळ आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कालच जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. केवळ दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू राहणार आहेत.

कोरोनाबाधितांची कालची स्थिती
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९०, अकोले ११, जामखेड ४०, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १५, नेवासा ०६, पारनेर ०१, पाथर्डी ०७, राहता २७, राहुरी ०४, संगमनेर १७, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५६, अकोले ११, जामखेड ०१, कर्जत ०४, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ३०, नेवासा ०६, पारनेर ०९, पाथर्डी ०६, राहाता ३४, राहुरी १६, संगमनेर ४१, शेवगाव १०, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट ०७ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३७३ जण बाधित आढळुन आले. मनपा ५३, अकोले २३, जामखेड ३०, कर्जत ६८, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १८, नेवासा १२, पारनेर ११, पाथर्डी १४, राहाता ३२, राहुरी ४५, संगमनेर १४, शेवगाव ०५, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा १८६, अकोले ०६, जामखेड ०५, कर्जत २०, कोपरगाव २१, नगर ग्रामीण २१, नेवासा २२, पारनेर १३, पाथर्डी ३४, राहाता ७२, राहुरी ३३, संगमनेर २९, शेवगाव २९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ८३, कॅन्टोन्मेंट ०४ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:८५६५२
उपचार सुरू असलेले रूग्ण:६३८५
मृत्यू:१२०५

Advertisement

आजची आकडेवारी अशी आहे
महापालिका – ४३३
राहाता – २२९
श्रीरामपूर – ११६
कोपरगाव – ११४
संगमनेर – १०५
कर्जत – १०१
राहुरी – ९२
नगर – ७४
पाथर्डी – ६३
अकोले – ६१
शेवगाव – ६१
पारनेर – ६०
नेवासा – ५५
जामखेड – ३७
श्रीगोंदा – ३७
कॅन्टोन्मेंट – १६
मिलिटरी हॉस्पिटल – १४
जिल्ह्याबाहेरील – १२
————–
डीएच लॅब – ६७७
आरटीपीसीआर – ५१४
रॅपिड अँटीजेन – ४८९
एकूण – १६८०

Advertisement