SpreadIt News | Digital Newspaper

10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा कशा आणि कुठे होणार? तुम्हाला काय करावं लागणार, वाचा तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं..

0

कोरोना दिवसेंदिवस भलताच वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन कोलमडलं आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सध्या ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा देण्याचा सरकारने प्लॅन आखला आहे. त्यासाठी दहावी-बारावीचे शिक्षक वगळून पाचवी ते अकरावीच्या वर्गांवरील शिक्षकांना (को-मॉर्बिड तथा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना वगळून) पर्यवेक्षकाची ड्यूटी देण्याचं काम चालू आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी याआधीच स्पष्ट केल्या होत्या-

Advertisement

“दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल. यासोबतच विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या घरातील व्यक्‍ती कोरोनाबाधित अथवा जो विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी अंदाजे 15 जूनपूर्वी स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे”, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. दहावीसाठी 16 लाख तर बारावीसाठी अंदाजित 14 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Advertisement

या परीक्षांआधी पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त झालेल्या शिक्षकांची कोरोना टेस्ट करावयाचं नियोजन आखलं आहे. तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदर हजर राहावं लागणार आहे, जेणेकरून कोरोनाविषयक काळजी घेण्यामध्ये मदत होईल.

विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंबंधी परीक्षेच्या 8 दिवस अगोदर सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या शाळेतच म्हणजेच ज्या शाळेत त्यांचं शिक्षण चालू आहे, अशा शाळांमध्ये परीक्षा होणार असल्याने जागा कमी पडणार नाही, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाळले जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच प्राधान्य राहील, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी स्पष्ट केले.

Advertisement

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितलं की..

परीक्षेपूर्वी पर्यवेक्षकांची ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांची कोरोना टेस्ट होणार.

Advertisement

वर्ग नियंत्रण, परीक्षेचे नियोजन, शिस्त-नियमांचे पालन, अशी कामे ज्येष्ठ शिक्षकांना दिली जातील.

माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील पाचवी ते अकरावीच्या सर्वच शिक्षकांवर असेल परीक्षेची जबाबदारी.

Advertisement

तालुका स्तरावर परीक्षेचे नियोजन करण्यासाठी केंद्र प्रमुखांवर जबाबदारी असेल; केंद्र प्रमुखांच्या जोडीला सहाय्यक केंद्रप्रमुख असेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement