SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी, नक्की वाचा

◼️मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाणाच्या आत्महत्येच्या मुळाशी वाघ आणि सागवान तस्कर असल्याचे सांगत, आठवडाभरात सरकारने कारवाई न केल्यास पुरावे सार्वजनिक करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा इशारा!

◼️ कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता परभणी मध्ये 15 दिवस पुन्हा एसटी बंद; खाजगी आणि सार्वजनिक वाहने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Advertisement

◼️ मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यात अनुष्का शर्मा कामावर झाली रुजू; व्हॅनिटी व्हॅन मधून उतरताना फोटो झाले व्हायरल!

◼️ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत निगेटिव्ह असलेले नातेवाईक सेवेसाठी थांबण्याची नांदेड शासकीय रुग्णालयाची सूचना; व्हायरल व्हिडिओने धक्कादायक प्रकार झाला उघड!

Advertisement

◼️ राज्यातील घर खरेदीच्या मुद्रांकशुल्क सवलतीला मुदतवाढ मिळणार नाही, 1 एप्रिल पासून 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार;राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली माहिती

◼️ कोरोना लसी ची निर्माता कंपनी फायझर कडून महत्वाचे वृत्त; 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरची कोरोना लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट

Advertisement

◼️ सहा महिन्यात तिसरी नायिका; प्राजक्ता गायकवाडनंतर विना जगतापनेही सोडली ‘आई माझी काळुबाई’ मालिका, आता रश्मी अनपट साकारणार आर्याची भूमिका

◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे DGCA च्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे; मुख्यमंत्री ठाकरेंचे निष्कर्ष!

Advertisement

◼️राज्यात मर्यादित लॉकडाऊनची चर्चा; कोणाचीही रोजीरोटी जाण्यासारखा राज्य सरकार निर्णय घेणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊतांचे वक्तव्य, तर वाढत्या प्रदूर्भावाच्या अनुषंगाने नागपुरात उद्यापासून राज्य सरकारचा प्रोटोकॉल होणार लागू!

Advertisement