SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

1 एप्रिलपासून तुमचा पगार, पीएफ, ग्रॅच्युइटी, कामाच्या वेळेत होणार मोठा बदल; सरकार करतंय ‘हा’ विचार..

जर तुम्हीही नोकरी करत असाल, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या मार्च महिना असल्यामुळे आर्थिक वर्ष संपत आहे आणि नोकरी करणाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून काही मोठे बदल होऊ शकतात. या काही बदलांनंतर तुमचा पीएफ, कामाचे तास आणि वेतनसारख्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सोबतच, ग्रॅच्युइटी व पीएफही वाढेल. त्यामुळे नोकरदार वर्गाची टेक होम सॅलरी कमी होईल.

दरम्यान, या प्रस्तावाच्या नियमांवर अद्याप चर्चा सुरु आहे, कि त्याची अंमलबजावणी कशी केली जाऊ शकते. हे बदल मागील वर्षी संसदेत मंजूर झालेल्या तीन वेतन संहिता विधेयक (कोड ऑन वेजेस बिल) मुळे होऊ शकतात. यंदा हा प्रस्ताव या वर्षी 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

काय बदल होण्याची शक्यता?

▪️ सॅलरीमध्ये होऊ शकतो बदल –

Advertisement

सरकारच्या प्लॅनप्रमाणे, 1 एप्रिलपासून नोकरी करणाऱ्यांचे मूळ वेतन, त्यांना असणाऱ्या एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असावं. यामुळे कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही फायदा होऊ शकतो, असा सरकारचा दावा आहे.

▪️ PF मध्ये वाढ होण्याची शक्यता –

Advertisement

या चर्चा असणाऱ्या नव्या नियमांनुसार, आपल्या पीएफमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे इन हँड सॅलरी कमी मिळू शकते. तर मूळ वेतन, एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असावं, या बदलामुळे अधिक लोकांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये म्हणजेच वेतन स्वरूपात काही बदल होण्याची शक्यता आहे. मूळ वेतन वाढल्याने, तुमच्या पीएफमध्येही वाढ होईल, कारण हे तुमच्या बेसिक सॅलरीवर आधारित असतं.

▪️ 12 तास काम करावं लागणार ?

Advertisement

यामध्ये 12 तास काम करण्याचा प्रस्तावही आहे. तर 15 ते 30 मिनिटं एक्स्ट्रा काम करणं ओव्हरटाईममध्ये सामिल करण्याची तरतूद आहे. आताच्या परीस्थितीत 30 मिनिटांहून कमी वेळेसाठी एक्स्ट्रा काम केल्यानंतर त्याला ओव्हरटाईममध्ये सामिल केलं जात नाही.

▪️ 5 तास काम आणि अर्धा तास ब्रेक –

Advertisement

तुम्ही 5 तासांहून अधिक काळ सलग काम असाल तर या सलग काम करण्यावर प्रतिबंध करण्याचं सरकारचं म्हणणं आहे. कर्मचाऱ्यांना 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जावा, असंही सरकारने म्हटलं आहे.

▪️ सेवानिवृत्तीची रक्कम वाढेल –

Advertisement

पीएफची रक्कम वाढल्याने तुमच्या हातात येणारा पगार कमी असेल, परंतू सेवानिवृत्तीच्या काळात या रकमेतही वाढ होईल. रिटायरमेंटनंतर तुम्हाला या रकमेचा फायदा होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement