SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ मंगळवार, 30 मार्च 2021

मेष : कामाची धांदल राहील. वैचारिक स्थिरता जपावी. आवडी-निवडीवर अधिक भर द्याल.

Advertisement

वृषभ : सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन फॅशनचे कपडे खरेदी कराल.

मिथुन : अतिविचार करणे टाळावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. हातातील कामाचे योग्य नियोजन करावे.

Advertisement

कर्क : नवीन मित्र जोडले जातील. तुमच्यातील शालीनता दिसून येईल. जिथे जाल तिथे आनंद वाटाल.

सिंह : घराची उत्कृष्ट सजावट कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

Advertisement

कन्या : इतरांना सढळ हाताने मदत कराल. सर्वांसमोर तुमची कला सादर करता येईल. गायन, वादन कलेला पोषक वातावरण लाभेल.

तूळ : व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून वागाल. कमी श्रमात कामे पार पडतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी.

Advertisement

वृश्चिक : पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्याल. महिलांना गृहिणीपदाचा मान मिळेल.

धनु : आपले गुण सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

Advertisement

मकर : दिवस मौजमजेत घालवाल. कलात्मक दृष्टीने वागणे ठेवाल. काहीसा व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल.

कुंभ : घराची स्वच्छता काढाल. बागबगीच्यात रमून जाल. उत्तम गृहसौख्य लाभेल.

Advertisement

मीन : वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन गोष्टी शिकून घ्याल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement