SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…तर गुरुवारपासून बँकांची ‘मेसेज सुविधा’ बंद? घरी बसून बँकांची कामे करत असाल तर ही बातमी नक्की वाचा..

सरकारी बँकांना ट्रायच्या नियमावलीचे गांभीर्य नसल्याचं दिसतंय. म्हणून येत्या 31 मार्चपर्यंत ट्रायच्या नियमावली संबंधित आवश्यक बाबींची पूर्तता न केल्यास 1 एप्रिलपासून संबंधित आस्थापनांची व्यावसायिक मेसेज सुविधा बंद करण्याचा इशारा ट्रायने दिला आहे.

कारण काय?

Advertisement

एसएमएस रेग्युलेशनच्या अंमलबजावणीसाठी बँकांना आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागते. तशी पूर्तता करण्याचे निर्देश ट्रायने देऊनही वित्तीय संस्था व व्यावसायिक आस्थापनांकडून चालढकल सुरू आहे.

दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बल्क मेसेज सुविधेचा गैरफायदा घेऊन ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत.

Advertisement

या फसवणुकीचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायने 2018 साली लघुसंदेश नियमावली (एसएमएस रेग्युलेशन) लागू करण्याचा ठरवलं.

या नियमावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी 2 वर्षे लागली. 8 मार्च 2021 रोजी या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, बऱ्याच आस्थापनांनी एसएमएस रेग्युलेशनच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याने त्यास 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. परंतु, त्यानंतरदेखील या कंपन्यांनी दाद दिली नाही, मग आता ट्रायने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

नियमावलीची गरज का?

व्यावसायिकदृष्ट्या पाठविलेले सर्व मेसेज दूरसंचार कंपन्यांकडून पडताळले जातील. टेम्प्लेट व मजकूर आधी तपासला जाणार मग त्यानंतर संबंधित मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल. तसेच, संशयास्पद मेसेज रद्द केला जाईल. ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने एसएमएस रेग्युलेशन महत्त्वपूर्ण असून, ऑनलाइन फसवणुकीला आळा बसेल, असे ट्रायने म्हटले आहे.

Advertisement

कोणाचा समावेश-

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, बजाज फायनान्ससह 40 वित्तीय आस्थापना आणि 40 टेलिमार्केटिंग कंपन्यांचा समावेश.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement