SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💁🏻‍♂️ दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा!

📌 बीड जिल्ह्यातील परळी आगारातील एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांना मुंबई येथे कोरोनाच्या भीतीने बेस्ट सेवेसाठी जाण्यास नकार देणे पडले महागात; 14 जण निलंबित!

📌 काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोना व्हायरसची लागण; ट्विट करत दिली माहिती!

Advertisement

📌 देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आज दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली बायपास सर्जरी यशस्वी; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती!

📌 ‘आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा’, पृथ्वीराज चव्हाणांचा राज्य सरकारला रोखठोक सल्ला

Advertisement

📌 बांगलादेश न्यूझीलंड दरम्यान रंगलेल्या टी-20 सामन्यात घडला अजब प्रकार; डी एल एस लागू केल्यानंतर टार्गेट न मिळताच बांग्लादेश ची टीम खेळली चार ओवर; मॅच रेफ्री जैफ क्रो देखील पडले गोंधळात!

📌 “कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधनं कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे. लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधनं जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो,” आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे लॉकडाऊन संदर्भात सूचक वक्तव्य!

Advertisement

📌सेन्सेक्समधील सर्वोच्च 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलमध्ये गेल्या आठवड्यात सामूहिकरित्या 1,07,566.64 कोटी रुपयांची घट; यातील अर्धे नुकसान रिलायन्स चे, गुंतवणूकदारांना फटका!

📌नांदेडमधील गुरुद्वाराबाहेर पोलिसांवर झालेल्या हिंसेत 18 जणांना अटक; तर 410 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल, होळीनिमित्त शीख समाजात नांदेडमध्ये काढल्या जाणाऱ्या ‘हल्ला मोहल्ला’ या मिरवणुकीसाठी परवानगी नाकारल्याने संतप्त शिखांनी पोलिसांवर तलवारीने हल्ला केला होता

Advertisement

📌ड्रग डीलर शादाब बटाटा याच्या चौकशीतून बिग बॉस फेम अभिनेता एजाझ खान चे नाव समोर; मुंबई एअरपोर्टवरून एनसीबीने घेतले ताब्यात!

📌 माधुरी दिक्षितच्या डान्स दीवाने या रियालिटी शो मधील 18 क्रू मेंबर्सला कोरोनाची लागण!

Advertisement