SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हॉटेल सारखे चविष्ट जेवण बनवण्याच्या काही खास टिप्स!

स्वयंपाक करताना प्रत्येकाच्या मनात एकच विचार असतो आणि तो म्हणजे जो कोणी हा स्वयंपाक खाणार आहेत त्याला तो आवडावा. पूर्वीच्या काळी फक्त स्त्रिया स्वयंपाक घरात विविध पदार्थ करून बघत. आजच्या काळात मात्र, पुरुष देखील स्वतः आवडीने स्वयंपाकघरात येतात आणि विविध पदार्थ करून बघतात. अनेक मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा शेफ म्हणून पुरुषांची संख्या जास्त असते.

हॉटेलमध्ये असे वेगळे प्रकार कोणते बनवले जातात? किंवा ते करताना नेमकी काय वेगळी पद्धत वापरली जाते? हे जर आपल्याला कळाले तर, आपणही घरी तेवढा चविष्ट स्वयंपाक बनवू शकतो.

Advertisement

बिर्याणी किंवा दाल तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर आणण्यासाठी बिर्याणी झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या, आणि त्यात दोन ते तीन लवंगा आणि एक टीस्पून तूप टाका. त्यानंतर घट्ट झाकण ठेवा. दोन ते तीन मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येऊन जाईल.

दाल मखणी हॉटेलमध्ये बनवतात तशी बनवण्यासाठी उडीदाची डाळ अख्खी वापरा. कमीत कमी सात ते आठ वेळा धुऊन घ्या, आणि नंतर भिजत ठेवा. यानंतर न धुता ती शिजवा त्यामुळे डाळीला वेगळीच चव येते.

Advertisement

जैन जेवण बनवताना कसरत होते ती करणाऱ्या हातांची. कांदा, लसूण नसल्याने चव कशी येणार असा प्रश्न असेल तर, ओवा आणि हिंग याचा वापर तडका देण्यासाठी करा! चविष्ट जेवण बनेल.

दही जर तुम्हाला चांगले घट्ट करायचं असेल आणि ते घरी लावायचे असेल तर विरजण लावताना, कोमट दुधात दही घातल्यानंतर हिरव्या मिरचीचे तीन किंवा चार देठ टाका. यामधील एन्झाइम्स मुळे दही चांगले घट्ट होईल.

Advertisement

हिरव्या भाज्या चिरताना त्यांचा हिरवा रंग आपल्याला जास्त जाणवतो. मात्र, शिजवताना त्याचा रंग निघून जातो. रंग तसाच ठेवण्यासाठी भाज्या शिजवताना एक टी स्पून खाण्याचा सोडा टाकल्यास तो रंग उडून जात नाही.

लसूण सोलणे हे स्वयंपाकातील सर्वात अवघड काम आहे. जर तुम्हाला चटकन लसूण सोलायचा असेल तर, एक मिनिटे ओव्हनमध्ये तो गरम करून घ्या. त्यानंतर, घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा. लसणाच्या पाकळ्या आपोआप निघून येतील.

Advertisement

सफरचंद कापल्या नंतर ऑक्सिडेशन रिअॅक्शनमुळे ते काळे पडायला सुरवात होते म्हणून त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा मग काळे पडणार नाही. सॅलड बनवताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.

 

Advertisement

 

Advertisement