अर्जुन रामपाल याचे नाव आपण बॉलिवुडमध्ये अनेकदा ऐकले आहे. प्रमुख भूमिकेत असला तरी अतिशय दमदार भूमिका करण्यासाठी तो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ओळखला जातो. याच विषयी एक धक्कादायक खुलासा आता एन सी बी ने केला आहे.
सुशांत सिंह राजपूत या आघाडीच्या अभिनेत्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आले. यामध्ये एनसीसीबी अनेक बड्या अभिनेत्यांची चौकशी करण्यात आणि मोठे मोठे ड्रग्ज स्मगलिंग करणारे लोक पकडण्यात व्यस्त होती. एन सी बी ने चार्जशीट दाखल केली आहे. त्यात अर्जुन रामपाल याचे देखील नाव पुढे आले आहे.
आपण सगळेच जाणतो की, एनसीबी अर्जुन रामपाल च्या गर्लफ्रेंड च्या भावाच्या मागे, त्याचबरोबर अर्जुन च्या देखील मागे चौकशीचे सत्र चालू करण्याच्या तयारीत होती. चौकशी साठी डिसेंबरमध्ये तो हजरही झाला. मात्र त्याआधी नेमके काय झाले, हे एन सी बी ने एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे.
रिपब्लिक ऑफ साउथ आफ्रिकेच्या काऊनस्लेट जनरलला देखील एन सी बी ने पत्र लिहून याची माहिती दिली होती.
अर्जुन रामपाल च्या घरावर जमा एमसीबी ने छापा टाकला होता. त्यानंतर त्याच्या घरातून औषधांच्या विविध बाटल्या मिळाल्या होत्या.
“रिया चक्रवर्ती ला अटक झाली आहे आणि अर्जुन रामपाल कडे आम्ही संशयित म्हणून पहात असून, तो आफ्रिकेला पळून जाण्याचे चिन्ह आहे”, असे एका पत्रामध्ये एनसीबी ने रिपब्लिक ऑफ साउथ आफ्रिकेच्या काऊनस्लेट जनरलला सांगितले आहे. ते पत्र 3 डिसेंबर 2020 चे आहे.
या पत्रात त्याच्या गर्लफ्रेंडचा भाऊ हा आफ्रिकन नागरिक असल्याकारणाने, अर्जुन रामपाल चा व्हिसासाठी तुमच्याकडे अर्ज आल्यास त्याच्यावर तुम्ही त्वरित कारवाई करा, असे देखील म्हणण्यात आले होते.
14 डिसेंबरला त्याला समन्स पाठवण्यात आले आणि त्यानंतर 16 डिसेंबरला चौकशीसाठी रामपाल ला एन सी बी ने कार्यालयात बोलावले होते.