SpreadIt News | Digital Newspaper

खळबळजनक! हॅकर्सकडून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची केली मागणी

0

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा म्हणजेच एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्याची खळबळ राज्यात उडाली आहे. ज्या हॅकर्सने एमआयडीसीचा सर्व्हर हॅक केला त्या हॅकर्सकडून तब्बल 500 कोटींची मागणी करण्यात आली आहे. या हॅकर्सने Midc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटीं रुपयांच्या मागणीचा मेल केल्याची माहिती आहे.

हॅकर्सने दिली डेटा नष्ट करण्याची धमकी

Advertisement

प्राप्त माहितीनुसार, मागील सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे मुंबईतील मुख्य कार्यालय आणि राज्यातील 16 प्रादेशिक कार्यालयामधील पूर्ण कामकाज एकाच वेळी बंद पडले. त्यानंतर Midc च्या अधिकृत मेल करत हॅकर्सने 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर ही 500 कोटी रुपयांची आमची मागणी पूर्ण केली नाही, तर आम्ही डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील तुमचा सगळा महत्वाचा डेटा नष्ट करु, अशी धमकीच दिली आहे.

संपूर्ण कामकाज ठप्प!

Advertisement

एमआयडीसी च्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची सर्व माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर असणाऱ्या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.

जर एमआयडीसीतील कॉम्प्युटर्स सुरु केले तर त्यात लगेच व्हायरस दिसतो आहे. म्हणून या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डेटा नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर्स चालू न करण्याची सूचना केली आहे.

Advertisement

एमआयडीसीचा सर्व्हर हॅक प्रकरणी सर्व डेटा रिस्टोर करावा. त्याशिवाय याबाबत सायबर सेलकडे तक्रार करावी, असे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान हे हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. सध्या त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

कामकाजाची पर्यायी व्यवस्था करा

Advertisement

एमआयडीसीचा डेटा हॅक झाल्याचे कळताच काही वेळात एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरु करण्यात आली. यानंतर कामकाज ठप्प झाल्यानंतर एमआयडीसी सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून केली जात आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement