SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आमदाराच्या ड्रायव्हर कडे एक कोटी सापडले; आयकर विभागाच्या छापेमारीने देशभरात खळबळ!

आमदार, खासदार, मंत्री, अशा मोठ्या लोकांकडे किंवा राजकारणातील दिग्गज मंडळींकडे करोडो रुपयांची संपत्ती असणे हे स्वाभाविक असले तरी देखील त्यांच्या ड्रायव्हर कडे जर करोडोंची मालमत्ता सापडली तर मात्र, कोणीही आश्चर्य व्यक्त करेल.

अशीच आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट घडली आहे. इन्कम टॅक्स छापेमारी मध्ये चक्क आमदाराच्या ड्रायव्हर च्या घरातून 1 कोटी रुपये जप्त झाले आहेत. अण्णाद्रमुकच्या आमदार के. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरकडे ही रक्कम सापडल्याने देशभरात खळबळ माजली आहे.

Advertisement

आयकर विभागाकडून ही रक्कम जप्त करण्यात आल्याने आमदाराच्या ड्रायव्हरकडे एवढी संपत्ती कशी काय, हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे! या ड्रायव्हरचे नाव अलगरासामी असे आहे. त्याचे वय 38 असून त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई या मतदार संघातील आमदार चंद्रशेखर यांचा तो ड्रायव्हर आहे.

गेली 10 वर्ष तो त्यांच्यासाठी काम करत असून, चंद्रशेखर यांच्या घराजवळ असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने ही छापेमारी केली. कोणतेही कागदपत्र किंवा आवश्यक त्या माहितीशिवाय हे एक कोटी रुपये आढळल्याने आयकर विभागाला संशय आला आहे. 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम जप्त करण्यात आली.

Advertisement

500 रुपयांच्या एकूण 2 हजार नोटा यातून जप्त करण्यात आल्या आहेत. त्रिची जिल्ह्यातील इन्कम टॅक्स को डिरेक्टर मदन कुमार यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांनी अलगरासामी यांच्यासह थंगपंडी आणि आनंद यांच्या घरावर देखील छापेमारी केली आहे.

हे देखील चंद्रशेखर यांचे साथीदार असल्याचे आयकर विभागाने निश्चित केले आहे. मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने तातडीने ही कारवाई करत एक कोटी रुपये जप्त केले आहेत.

Advertisement