SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फसलेलं जहाज निघता निघेना, समुद्रातील ट्राफिक हालता हालेना..!

तुम्ही रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालेले ऐकले असेल, परंतु एक आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. चक्क समुद्रात जॅम लागला आहे. हा एक दोन तासांचा किंवा एक दिवसाचा नाही तर चक्क 4 दिवसांपासून समुद्री रस्ता खोळंबला आहे. अनेक मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत.

इतिहासाच्या पुस्तकात सुएझ कालवा, पनामा कालवा वाचला असेल किंवा ऐकला तरी असेल. तेथे ही जहाज कोंडी झालीय. तर पनामा कालव्यात एव्हर गिव्हन मालवाहू जहाज अडकले आहे.

Advertisement

सुएझ कालव्यातून दरवर्षी मालवाहू जहाजांची वाहतूक वाढत आहे. ती ‎1870 मध्ये 486 होत होती. 2020 मध्ये ही संख्या 19,000 वर गेली. साधारपणे 1.17 अब्ज टन सामानाची ने-आण या कालव्यातून झाली. त्याची 193 किलोमीटर लांबी व 205 मीटर रुंदी आहे. त्यामुळे मोठी जहाजे येथे अडकतात. हे अडकलेले जहाज जपानचे आहे.‎

शोई किसेन कंपनीचे अध्यक्ष युकितो हिगाकी यांनी ट्रॅफिक जॅमविषयी पत्रकारांना माहिती दिली. आम्ही आमच्या परीने जहाज काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. जहाजावरील माल इतरत्र हलविला जात आहे. भरतीच्या वेळी लाटा येतात. त्या लाटांचा फायदा घेता येतो का हे पाहिले जाईल. ट्रॅफिक जॅममुळे इतरांना त्रास होतो आहे, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे हिगाकी म्हणाले.

Advertisement

नेदरलँडची कंपनी बॉस्केल्सचे कर्मचारीदेखील सूएझ कालवा प्राधिकरणाच्या मदतीला आले आहेत. व्हाइट हाऊसनेही मदतीचे आवाहन केले आहे. सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजात आपल्या देशातील तब्बल सर्व 25 कर्मचारी आहेत. ते सर्वजण सुरक्षित आहेत, असे निवेदन सरकारने काढले आहे. जहाजाचे चालक दल भारताचे आहे. त्यांच्या जोडीला इजिप्तचे दोन तज्ज्ञ चालक दाखल झालेत. या जहाजामुळे भारत आणि चीनकडे जाणारे सुमारे 16 तेलवाहू जहाज अडकून पडली आहेत.

जपानी कंपनीच्या मालकीचे असलेले महाकाय जहाज कालव्यात अडकल्याने सुमारे 200 हून अधिक मालवाहू जहाज वाहतूक कोंडी सुटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच शंभराहून अधिक जहाज त्या मार्गावर आहेत. एव्हर गिव्हन जहाजामुळे निर्माण झालेली कोंडी तूर्त सुटत नसल्याचे पाहून काही जहाजांनी मार्ग बदलले आहेत. आफ्रिकेला वळसा घालून ते मार्गस्थ होत असल्याचे उपग्रहाच्या डेटावरुन समजते.

Advertisement

सागरी व्यापारात सुएझ कालव्याचे मोठे महत्त्व आहे. हे जहाज 400 मीटर लांब म्हणजेच चार फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढे मोठे आहे. ते 20 हजार कंटेनर घेऊन जात होते. त्याची उंची दहा मजली इमारतीएवढी आहे.

या वाहतूक कोंडीमुळे दरतासाला इजिप्तला 2800 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. कारण इजिप्तला दररोज टोलमधून 67200 कोटी रुपये मिळतात. हे जहाज चीनहून नेदरलँडला चालले होते. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी 7 दिवस लागतील. पुरवठाच होत नसल्याने जगातील आवश्‍यक वस्तूंच्या किमतीत वाढू शकतात. एकट्या सुएझ कालव्यातून जगातील बारा टक्के व्यापार चालतो.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement