SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📣 दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

◼️ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही प्रकृतीची चौकशी केल्याने शरद पवार यांनी मानले आभार; राज्याचे राजकीय वातावरण हरप्रकारे ढवळून निघत असताना राजकीय नेत्यांकडून महाराष्ट्राची आपुलकीची परंपरा जपण्याचा प्रयत्न!

◼️ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अष्टविनायकांपैकी एक असलेले थेऊर चे चिंतामणी गणपती मंदिर बुधवारी संकष्टी चतुर्थी दिवशी बंद ठेवण्याचा उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांचा निर्णय

Advertisement

◼️ अबुधाबी येथे बांधण्यात येणारे हिंदूंचे स्वामीनारायण यांचे मंदिर एप्रिल महिन्यात होणार पूर्ण; गुजरात आणि राजस्थान येथील 2 सहस्रांपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाठवले होते मंदिराच्या उभारणीसाठी

◼️ कोरोना विषाणू हा वूहानच्या लॅबमधून नाही तर, प्राण्यांपासूनच मानवापर्यंत आल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा नवा दावा; चीनवर झालेले आरोप तथ्यहीन आहेत की काय? संभ्रम कायम!

Advertisement

◼️ जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पासपोर्ट देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने दिला नकार; ‘जम्मू-काश्मीरची परिस्थिती स्थिर झाली हे म्हणता याचा हाच अर्थ आहे का?’ म्हणत, मेहबूबा यांनी केली केंद्रावर आगपाखड

◼️ ‘मी ममता बॅनर्जी यांच्यासाठी देखील एका तासाच्या वर प्रचाराच्या रॅलीत थांबणार नाही’ म्हणत, नुसरत जहान यांचा पारा चढला; रॅली सोडून गेल्या स्वतःच्या गाडीने निघून

Advertisement

◼️ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक राज्यात होळी आणि धुळवडीवर निर्बंध घातलेले आहेत अशात, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उत्तराखंडमध्ये आपल्या घरी धुमधडाक्यात केला सण साजरा; पारंपारिक गाण्यांच्या तालावर धरला ठेका

◼️ ‘तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर झुकतात तेव्हा वाईट वाटतं,’ म्हणून राहुल गांधी यांनी साधला पंतप्रधानांवर आणि अण्णाद्रमुकवर निशाणा!

Advertisement

◼️ बाहुबली सुपरस्टार प्रभास याने वडिलांची इच्छा केली पूर्ण; दारात उभी केली 6 कोटींची लॅम्बोर्गिनी!

◼️ देसी गर्ल प्रियंका चोप्राने अमेरिकेत केली धुळवड साजरी; पती निक जोनस आणि सासु-सासर्‍यांनाही रंगवले भारतीय रंगात!

Advertisement