इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या एका चुक झाली. या चुकीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला पाहायला मिळाला.
इंग्लंडच्या सॅम करनने अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना जीवंत ठेवला होता. करनने यावेळी नाबाद 95 धावांची खेळी साकारली आणि भारताला चांगलीच लढत दिली. या दरम्यान हार्दिकने केलेल्या एका चुकीमुळे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळवला गेला.
हार्दिक पंड्याची नेमकी चुक कोणती झाली?
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील ही गोष्ट घडली ती सामन्याच्या 34व्या षटकात. यावेळी भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णन गोलंदाजी करत होता.
34व्या ओव्हरमध्ये पाचव्या सॅम करनने चांगलाच फटका मारला होता. सॅमने जिथे चेंडू मारला होता, त्या दिशेकडे भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या असल्याचे पाहायला मिळाले.
क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला हार्दिक पंड्या त्यावेळी चेंडूच्या दिशेने धावत होता. हा चेंडू हार्दिकच्या हातामध्येही आला होता; पण धावत असताना चेंडू हातातुन निसटला आणि तो मैदानात खाली पडला. चेंडू सुटला खरा पण यानंतरही तो सुटलेला चेंडू हार्दिकला पकडता आला नाही आणि त्यामुळे हार्दिकला चौकारही अडवता आला नाही.
या सुटलेल्या संधीमुळे सॅमला जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. येथे सॅमला जीवदान मिळाले यावेळी तो 22 धावांवर खेळत होता. जीवदानाचा अगदी चांगला फायदा उचलत सॅम करनने फक्त अर्धशतकच साकारले नाही, तर हा सामना अखेरच्या षटकापर्यंत घेऊन गेला.
हार्दिककडून क्षेत्ररक्षणामध्ये निराश कामगिरी पाहायला मिळाली. कारण या सामन्यात त्याने एकूण दोन झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने एक सॅम करन व दुसरा बेन स्टोक्सचा सोपा झेल सोडल्याचे बघायला मिळाले.
या सामन्यातील षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने यावेळी जोरदार फटका मारला. त्यावेळी नेमकं काय होईल, हे कोणालाच कळत नव्हते. पण काही क्षणातच हा चेंडू हार्दिक पंड्याच्या हातात येणार आणि भारतीय संघाला ही मोठी विकेट मिळणार असे दिसत होते.
हार्दिककडे हा सोपा झेल आला होता. त्यामुळे हार्दिक हा झेल पकडेल, असे वाटत असतानाच त्याने तो झेल सोडला पण आणि बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. त्यावेळी स्टोक्स हा 15 धावांवर खेळत होता. त्यावेळी विराट कोहली हा निराश झालेला दिसला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit