रंग, गुलाल, शेणाने नाही तर थेट ‘विंचू’ने ‘इथे’ खेळली गेली होळी; वाचा, भारतातील सर्वात खतरनाक होळीविषयी
भारतातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे … होळी, जो सर्वांचा आवडता रंगांचा सण आहे. एकमेकांना रंग, गुलाल लावून लोक होळी साजरी करतात आणि विविध प्रकारच्या मिठाई, गोडधोड जेवणाचा आनंद घेतात. कधी कधी तर गावातील तरुण आणि डांबरट मंडळी थेट शेणाचा वापर करूनही होळी साजरी करतात.
काही ठिकाणी चिखल आणि शेण एकत्र करून मजा घेतली जाते तर काही ठिकाणी काही अतरंगी लोक गुलालात मिरची पावडर मिक्स करूनही वेडेपणाची होळी खेळतात.
राज्यात आणि देशात विविध ठिकाणी विविध प्रकारे होळी खेळली जाते. होळीशी संबंधित अनेक प्रथा आहेत. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात होळीशी संबंधित विभिन्न श्रद्धाही आहेत. दर 15 मैलांवर भाषा बदलते. तशी संस्कृतीही बदलते. याचप्रमाणे भारतात एके ठिकाणी अशीच एका वेगळ्या प्रकारची होळी खेळली जाते. उत्तर प्रदेशातील बरसाना, नांदगाव आणि वृंदावनची लाठमार होळी पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात.
कारण भारतात सर्वात जास्त खतरनाक पद्धतीने होळी इथेच खेळली जाते. उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यात एक गाव आहे जिथे विंचूंची होळीवर पूजा केली जाते आणि त्यांच्याबरोबर होळी खेळली जाते. सैंथना या गावात ही खतरनाक आणि रिस्की होळी खेळली जाते. गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, या दिवशी विंचू लोकांना दंश करत नाहीत म्हणूनच या गावातील ग्रामस्थ बिनधास्त विंचूंशी खेळत अनोख्या पद्धतीने होळी साजरे करतात.
होळीचा दिवस वगळता इतर कोणत्याही दिवशी विंचू या गावातील लोकांना चावला तर त्याचे विष चढते. होळीच्या दिवशी ताखा तहसील परिसरातील सैंथना गावातील लोक भैसान देवीच्या डोंगरावर चढतात आणि शेकडो विंचू या टेकडीवरच बाहेर पडतात. हे बाहेर पडलेले विंचू मुले, मोठी माणसे आणि म्हातार्यांच्या हातातून आणि शरीरावरून फिरतात. विंचू लोकांच्या शरीरावर आरामात रेंगाळतात आणि लोकही बिनधास्तपणे त्या विंचूसोबत खेळतात.
इथे म्हातारी माणसे गाणी म्हणत असतात आणि विंचू त्यांच्या अंगा खांद्यावर खेळत असतात. विशेष बाब म्हणजे या गावात अशी होळी का खेळली जाते? यामागे काय प्रथा आणि कथा आहे, हे कोणालाही माहिती नाही.
सर्वसाधारपणे विंचू हे दंश करतात आणि त्याचे विषही चढते. मात्र हे अनोखे गाव आहे, जिथे फक्त या एकाच दिवशी विंचू दंश करत नाहीत. हे अविश्वसनीय असले तरी खरे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit