SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

औषधी शेती मध्ये मिळते जास्त उत्पादन; जाणून घ्या कशी करायची औषधी वनस्पतींची लागवड!

पारंपरिक आणि अपारंपरिक शेतीपेक्षा औषधी वनस्पतींच्या लागवडीतून केली जाणारी शेती ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशीर ठरणारी असते. कमी पाण्यात आणि जास्त सुपीक नसलेल्या जमिनीत देखील याचे उत्पादन होते, आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जसे पावसावर अवलंबून राहावे लागते तसे या शेतीकरता तितकेसे अवलंबून राहावे लागत नाही. ही एक फायद्याची गोष्ट आहे. तज्ञांचे देखील असेच मत आहे.

आज आपण जाणून घेणार आहोत, औषधी शेती करण्याचे प्रकार आणि कुठे केली जाऊ शकते अशी शेती याबद्दल!

Advertisement

औषधी शेतीचे तीन प्रकार

◼️थेट वापरले जाणारे पीक जसं की, तुळस

Advertisement

◼️आयुर्वेदिक औषधांत वापरले जाणारे औषधी पिके/ वनस्पती

◼️कंपनीसाठी लागणारे पिके/ वनस्पती

Advertisement

कुठे करता येते?

या शेतीला अधिक सुपीक जमीन किमान जास्त पाण्याची गरज नसते. त्यामुळे अशा कोणत्याही परिसरात ही शेती अगदी सहजपणे करता येते, जिथे जास्त सुपीक जमीन नसेल. त्यामुळेच, गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये औषधी शेतीचे प्रमाण जास्त आहे.

Advertisement

पिके

पुदिना, शतावरी, मोगरा, तुळस, अश्वगंधा, शंखपुष्पी, आणि ब्राम्ही अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमावता येते.

Advertisement

वैशिष्ट्य

तुळस, कोरफड, हळद, या गोष्टी जशा आपण घराभोवती लावतो तसेच शेतीत लावून कमी दिवसात जास्त प्रमाणात उत्पादन काढून उत्पन्नही व्यवस्थित मिळवता येते. ही शेती कमी खर्चाची असून त्यातून उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळते. कारण, या सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक तसेच ऍलोपॅथीच्या कोणत्याही औषधांमध्ये उपयुक्त आहेत, आणि हेच या शेतीचे वैशिष्ट्य आहे.

Advertisement