SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

4 कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लागणार? यात तुमचंही वाहन असू शकतं, जाणून घ्या..

देशात या घडीला 15 वर्षांहून जास्त जुन्या वाहनांची संख्या 4 कोटींच्या आसपास आहे. ही वाहनं प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशा वाहनांवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याचा विचार करत आहे.

ही 15 वर्षांहून अधिक जुनी वाहने कर्नाटक मध्ये सर्वात जास्त आहेत. यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा नंबर लागतो. तर आंध्र प्रदेश, तेलंगाणा, मध्य प्रदेश आणि लक्षद्वीपची माहिती त्यामध्ये उपलब्ध नाही. कारण त्या राज्यांकडे माहिती उपलब्ध नाही.

Advertisement

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ही माहिती जाहीर केली आहे. या मिळालेल्या माहितीनुसार, 4 कोटी वाहनांमधील 2 कोटी वाहने ही 20 वर्षांहून अधिक जुनी आहेत. या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवण्यात आला आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक जुनी वाहने कर्नाटकमध्ये असून त्यांची संख्या 70 लाख आहे.

तसेच, कर्नाटक पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये 56.54 लाख जुनी वाहने आहेत. त्या वाहनांपैकी 24.55 लाख वाहने ही 20 वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत. नवी दिल्लीत 35.11 लाख वाहने जुनी आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये 34.64 लाख, पंजाबमध्ये 25.38 लाख, तामिळनाडूमध्ये 33.43 लाख, पश्चिम बंगालमध्ये 22.69 लाख अशी जुनी वाहने आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान, हरियाणात अशा वाहनांची संख्या 12 लाखांजवळ आहे.

Advertisement

आसाम, बिहार, गोवा, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी, त्रिपुरा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आणि दमण दीव मध्ये जुन्या वाहनांची संख्या 1 लाख ते 5.44 लाखांच्या दरम्यान आहे.

राज्य सरकारांना प्रस्ताव-

Advertisement

देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या वाहनांवर आता ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव सर्व राज्य सरकारांना पाठवला आहे. यावर राज्य सरकार प्रस्तावावर विचार करून तो प्रस्ताव केंद्राकडे परत पाठवतील. त्यानंतरच ग्रीन टॅक्स लावण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement