SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ रविवार, 28 मार्च 2021

मेष : लहानांच्यात लहान होऊन खेळाल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

Advertisement

वृषभ : पैसे कमवाल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल.

मिथुन : सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. प्रयत्नवादी राहावे लागेल.

Advertisement

कर्क : काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य कराव्या लागतील. वडीलधार्‍या व्यक्तींचे विचार विरोधी भासतील.

सिंह : उष्णतेचे विकार वाढू शकतात. पत्नीच्या सुस्वभावीपणाची चुणूक दिसून येईल. कामातील व्यावहारिक बाजू जाणून घ्या.

Advertisement

कन्या : कामातील चिकाटी वाढवावी लागेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. भागीदाराशी मतभेद संभवतात.

तूळ : अपयशाला घाबरू नका. घरातील परिस्थिती लक्षात घ्यावी. घरगुती खर्चाचा अंदाज घ्यावा.

Advertisement

वृश्चिक : कामाचा विस्तार वाढवावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

धनु : कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करता येतील. नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागेल. खर्चाचे गणित सांभाळावे लागेल.

Advertisement

मकर : काही गोष्टी मनाशी पक्क्या कराव्या लागतील. कामातील उत्साहाला चिकाटीची जोड द्यावी.

कुंभ : सगळ्या गोष्टीत तत्परता दाखवाल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत-हसत कामे साध्य करून घ्याल.

Advertisement

मीन : कामाचा आवाका लक्षात घ्यावा. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. उगाच दिखाऊपणा करायला जाऊ नका.

Advertisement