SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खरंच ॲमेझॉन वर्धापन दिनानिमित्त फ्री गिफ्ट देतेय का? वाचा ‘त्या’ व्हायरल मेसेजविषयी..

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या नावानं फिरणाऱ्या एक बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमुळे खोट्या ऑफर्सच्या गळाला लागून शिकारही झाले आहेत.


📰 ताज्या बातम्यांसाठी ‘स्प्रेडइट’ जॉईन करा 👉 www.spreadit.in

Advertisement

व्हॉट्सॲपवर तुमच्या कॉन्टॅक्टपैकी काही जण तुम्हाला अ‍ॅमेझॉनच्या वर्धापनदिनानिमित्त अ‍ॅमेझॉन गिफ्ट देत आहे, असं म्हटलं आहे. व्हायरल मेसेजमध्ये अ‍ॅमेझॉन आपल्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष भेट म्हणून स्मार्टफोन देत आहे. असा मेसेज व्हॉट्सॲपवर व्हायरल होतोय. अनेक यूजर्सला हा मेसेज कोणी ना कोणी पाठवत आहे व त्यामुळे या मेसेजमागचे सत्य न पडताळता खूप जण तो मेसेज शेअर करत आहेत.

‘अमेझॉन’ वर प्रत्येकासाठी एक मोफत भेट आहे, अशा मेसेजमुळे तुम्हीही आनंदी होऊन लिंकवर विचार न करता क्लिक करत असाल तर याबद्दल एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.  

Advertisement

अ‍ॅमेझॉन आपल्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत भेटवस्तू देत असल्याचा एक मेसेज सध्या व्हॉट्सॲपवर फिरत आहे. अनेकजणांनी अ‍ॅमेझॉनच्या नावानं फिरणाऱ्या या लिंकवर क्लिक करत आपली वैयक्तिक माहिती भरल्याचा प्रकारही घडला आहे.

‘तो’ मेसेज कोणता?

Advertisement

जेव्हा यूजर्स या मेसेजवर क्लिक करतात तेव्हा “अभिनंदन, आमच्या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी आपली निवड झाली आहे. आजच्या मोफत भेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे Huawei Mate 40 Pro 5G Full Netcom 8GB + दर बुधवारी आम्ही याप्रमाणे 100 वापरकर्ते निवडतो आणि त्यांना आश्चर्यकारक बक्षिसे जिंकण्याची संधी देतो. या सर्वेक्षणचा हेतू आमच्या वापरकर्त्यांचा आहे”, पण असा मेसेज तुम्हालाही आला असेल तर सावधान. कारण अ‍ॅमेझॉन कंपनीकडून असा कोणताही मेसेज पाठवला जात नाही. अ‍ॅमेझॉन कंपनीनं तशी घोषणाही अद्याप केलेली नाही.

त्यामुळे फुटकच्या भूलथाप्पांना किंवा मेसजला बळी पडून आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. मोफत वस्तू मिळेल, त्यामुळे अशा बनावट मेसेजला अनेकजण बळी पडतात. तुम्हाला अशाप्रकराचा मेसेज आल्यास क्लिक करण्यापूर्वी पडताळून पाहा.

Advertisement

तज्ज्ञांच्या मते, अशा मेसेजद्वारे सायबर गुन्हेगार आपली वैयक्तिक माहिती शोधू शकतात. तसेच आपल्याला फोन करण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी, ओळख चोरीसाठी आपला डेटा वापरू शकतात. त्यामुळे अशापद्धतीचे मेसेज आल्यास त्याची आधी खात्री करा. कारण याबद्दल अद्याप अ‍ॅमेझॉनने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांच्या संकेतस्थळावही यासंबंधी कोणतीही जाहिरात अथवा माहिती नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement