आपल्याला वैद्यकीय शाखेतील काहीच कोर्स माहिती आहेत. परंतु अशा काही शाखा आहेत, तिकडे तुम्ही बिनदिक्कतपणे करिअर करू शकता. विशेष म्हणजे पॅकेजही चांगले मिळते. कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या शाखेचा उपयोग करावाच लागतो.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ऍनेस्थेटिस्टची आवश्यकता असते. योग्य प्रकारे भूल देता नाही आली तर शस्त्रक्रिया करताच येत नाही. किंवा भूलतज्ज्ञ शस्त्रक्रियेवेळी हवाच असतो. आता नेमका हा कोर्स कुठे असतो ते पाहू.
काय आहे पात्रता-
▪️ विद्यार्थ्याने फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व मॅथ्ससह बारावी उत्तीर्ण आवश्यक.
▪️ विद्यापीठातून एमबीबीएस पदवी आवश्यक.
▪️ एमबीबीएसनंतर ऍनेस्थेसियामध्ये पीजीसाठी अर्ज करता येतो
‘असे ‘ आहेत कोर्स-
▪️ बीएस्सी ऍनेस्थेसिया टेक्नॉलॉजी
▪️ ऍनेस्थेसियामध्ये बॅचलर ऑफ सायन्स
▪️ बीएस्सी ऑपरेशन थिएटर अँड ऍनेस्थेसिया टेक्नॉलॉजी
▪️ बीएस्सी ऍनेस्थेसिया अँड ऑपरेशन थिएटर टेक्निक
▪️ बीएस्सी मेडिकल टेक्नॉलॉजी
▪️ ऍनेस्थेसियामध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन
▪️ ऍनेस्थेसियोलॉजीमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन
▪️ ऍनेस्थेसियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
करिअर कसे करावे?
▪️ बारावीनंतर NEET द्यावी लागेल.
▪️ पीजी स्पेशलायझेशन करावे लागेल.
टॉप मेडिकल कॉलेज-
▪️ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली
▪️ अमृता वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन केंद्र, कोची
▪️ पुणे सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज
करिअरची शक्यता-
ऍनेस्थेसियोलॉजिस्टसाठी करिअरच्या बऱ्याच संधी आहेत. त्यांना वैद्यकीय विद्यापीठ किंवा शाळा, सार्वजनिक क्षेत्र, स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा फिजिशियन ऑफिसमध्ये नोकरी मिळते. ऑपरेशन दरम्यान त्यांचा रोल महत्त्वाचा असतो.
कामाचे स्वरूप-
▪️ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट असिस्टंट
▪️ सर्टिफाइड रजिस्टर्ड नर्स ऍनेस्थेटिस्ट
▪️ ऍनेस्थेसिया टेक्निशिअन
▪️ मेडिकल कन्सल्टंट
▪️ सर्जन
या क्षेत्रात किमान 50 हजार रूपये मासिक वेतन मिळते. इतर ठिकाणीही तुम्ही प्रॅक्टीस करू शकता. कोणतेही ऑपरेशन असो किमान 3 ते 5 हजार रूपये भूलतज्ज्ञ घेतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📰 ताज्या बातम्यांसाठी ‘स्प्रेडइट’ जॉईन करा 👉 www.spreadit.in