अहमदनगर – शेजारील औरंगाबाद, बीड हे जिल्हे लॉकडाउन झाले आहेत. पुण्यातील स्थितीही फारशी बरी नाही. नाशिकमध्येही तीच परिस्थिती आहे. नगर शहर व जिल्ह्यात दररोज वाढणारे पेशंट चिंतेत भर टाकीत आहेत. रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा विस्फोट केला आहे. जिल्हा प्रशासनही वारंवार निर्बंध कडक करीत आहे. सकाळी आठ ते रात्री सातपर्यंत आस्थापनांना मंजुरी दिली आहे. एकंदरीत जिल्ह्याची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉकडाउनचे निर्देश दिले आहेत.
आज रविवारी तब्बल १२२८ कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता रुग्णांची संख्या आता ५,२४२ इतकी झाली आहे. जिल्ह्यात राहाता, नगर, संगमनेर तालुके रेड झोनमध्ये आहेत. तेथे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५९९ आणि अँटीजेन चाचणीत ३७२ रुग्ण बाधीत सापडले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुन्हा कडक निर्बंध लागू केलेत.
मनपा १०२, अकोले ३, कर्जत १३, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ८, नेवासा १२, पारनेर ४, पाथर्डी १, राहता ३८, राहुरी २, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर २ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड २२ असे रूग्ण आढळले. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मनपा २२१, अकोले १२, जामखेड २, कर्जत ४, कोपरगाव ५२, नगर ग्रामीण २३, नेवासा १२, पारनेर १४, पाथर्डी ५, राहाता ७४, राहुरी १८, संगमनेर ६७, शेवगाव ६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ५४, कॅंटोन्मेंट ७ आणि इतर जिल्हा १८ अशी वर्गवारी आहे.
अँटीजेन चाचणीत रविवारी ३७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ३१, अकोले १२, जामखेड ४५, कर्जत ४२, नगर ग्रामीण ६, नेवासा २८, पारनेर १७, पाथर्डी ३३, राहाता १४, राहुरी ६२, संगमनेर १७, शेवगाव १६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्ण आहेत. रविवारी मनपा २९१, अकोले १४, जामखेड ३७, कर्जत १८, कोपर गाव ७६, नगर ग्रामीण ३४, नेवासा २७, पारनेर २१, पाथर्डी १९, राहाता १११, राहुरी २६, संगमनेर ८४, शेवगाव १५, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर ५२, कॅन्टोन्मेंट १५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
बरे झालेली रुग्ण संख्या – ८४,३६१
उपचार सुरू असलेले रूग्ण – ५,२४२
एकूण मृत्यू – १,१९२
एकूण रूग्ण संख्या – ९०,७९५