SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्यवसाय करायचा विचार करत आहात? तुमच्या साठी देशातील ही कंपनी देत आहे सीएनजी पंप उघडण्याची संधी…

नोकरी करून कंटाळा आला असेल किंवा नोकरी करायची इच्छाच नसेल तर, माणूस व्यवसायाकडे वळण्याचा विचार करतो. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर एक उत्तम आणि व्यवस्थित कमावून देणारा व्यवसाय तुमची वाट पाहत आहे. देशातील नामांकित कंपनी सीएनजी पंप उघडून देण्याची संधी तुमच्या पुढे ठेवत आहे. काय आहे पूर्ण प्रक्रिया, जाणून घेण्यासाठी हा लेख आहे अत्यंत महत्वाचा!

गेल गॅस च्या वतीने सी पी आय एल कंपनी बंगळुरूमध्ये 100 ठिकाणी पेट्रोल स्थानके उभारण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. या दोन्ही कंपन्यांच्या संयोगाने सीएनजी पंप बसवण्याची निविदा काढण्यात येणार आहे.

Advertisement

येत्या तीन वर्षात 100 सीएनजी स्थानके उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. वाहन एलपीजी प्रमुख खुदरा केंद्रात आणि शहराच्या मुख्य ठिकाणीही स्थानके उभारण्याचे कंपनी निश्चित करत आहे.

आतापर्यंत या कंपनीने 55 सीएनजी स्थानके उभारले आहेत देशाच्या प्रमुख शहरांमध्ये ही स्थानके असून, देशाच्या 52 शहरांमध्ये हे नेटवर्क काम करते. सीपीआय ही एक खाजगी गॅस रिटेलिंग कंपनी असून, 22 राज्यांमध्ये 209 वाहन एलपीजी स्थानके आहेत.

Advertisement

अन्य कंपन्या

गेल इंडिया व्यतिरिक्त अनेक कंपन्या सीएनजी पंप डिलरशिप देतात. यामध्ये इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, एचपीसीएल, गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, यांचा समावेश आहे.

Advertisement

कशी मिळवाल डिलरशिप?

विविध कंपन्या आपली डीलरशिप देण्यासाठी वर्तमानपत्रातून निविदा टाकत असतात. अशी जाहिरात तुम्हाला दिसली तर तुम्ही त्याद्वारे किंवा कंपनीच्या विविध हेडक्वार्टर्स मध्ये जाऊन चौकशी करून याबाबत माहिती मिळवू शकता. तुम्ही निविदा घ्यायला इच्छुक असाल तर कंपनी तुम्हाला तुमचे ओळख पत्र, तुमचा राहण्याचा कायमस्वरूपी चा पत्ता, असे काही पुरावे मागते, ते द्यावे लागतात. प्रत्येक कंपनीची प्रत्येक शहरानुसार सिक्युरिटी म्हणून ठेवून घ्यायची रक्कम वेगळी असते ती एकदा भरली की तुम्हाला डीलरशिप मिळवणे सहज सोपे होते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement