संपूर्ण जगात कोरोनाचा विस्फोट होत असताना पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने गुड न्यूज दिली होती. जगभरातील लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला होता. पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. एसआयआय पुढील काही दिवसांत पुन्हा एक आनंदवार्ता देणार आहे.
कोविशील्ड ही पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय)ची निर्मिती आहे. ते जगभरात प्रभावी ठरत आहे. आता ती दुसरी लस बाजारात आणत आहे. कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांनी तसे ट्विट केले आहे. युके आणि दक्षिण अफ्रिका येथील स्ट्रेनवर ही लस प्रभावी ठरेल. पुनावाला यांनी या लशीची चाचणी सुरू असल्याची माहिती दिली आहे.
युके आणि दक्षिण अफ्रिका येथील कोरोना स्ट्रेन भारतातही आला होता. कोरोनाच्या नव्या अवतारामुळे देशातील शासनही हवालदिल झाले होते. “सीरम आणि अमेरिकी व्हॅक्सिन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स या दुसर्या लसीची चाचणी भारतात सुरू आहे. ही लस सप्टेंबर २०२१ पर्यंत मार्केटमध्ये येऊ शकते, अशी आशा आहे.”
नोव्हावाक्सनं पुण्यातील सीरमसोबत लस निर्मिती केला होता. कोव्होवॅक्सने कोरोनाच्या मूळ विषाणूविरूध्द ९६ टक्के परिणामकारकता दाखवली होती.
सीरमच्या कोव्हिशील्ड लसीने देशातील नागरिकांना आधार दिला आहे. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. बीड, औरंगाबाद, पुणे, नागपूरसारखी शहरे लॉकडाउन होत आहे. त्यामुळे अदर पुनावाला यांनी दिलेली माहिती जगासाठीच दिलासा देणारी आहे.