SpreadIt News | Digital Newspaper

लहान मुलांना कोरोना लस द्यावी का? ती किती सुरक्षित आहे? अशा प्रश्नांवर तज्ञांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी वाचा!

0

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. प्रत्येकाला नव्या लाटेने ग्रासून टाकले आहे. ज्येष्ठांना, सरकारी सेवेतील लोकांना, कोरोना योद्ध्यांना लस दिली जात आहे. दुसरीकडे ही लस घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. ती किती सुरक्षित आहे, त्याचे काही दुप्षरिणाम तर होणार नाही ना. ती मुलांना द्यावी का, असे अनेक प्रश्नांचे मोहळ सध्या उठले आहे. प्रा. डॉ. जेम्स वुड यांनी लहान मुलांबाबत मते व्यक्त केली आहेत.

मुलांना लस द्यावी का?

Advertisement

लहान मुलांमध्ये कोविडचा संसर्ग फारसा होत नाही. 12 वर्षाखालील मुलांना कोविडचा संसर्ग झाल्यास त्यांना कमी त्रास होतो. काहींना तर लक्षणेही नसतात. पौगंडावस्थेतील मुलांना कोविडचा धोका लहान मुलांपेक्षा जास्त असतो. 5 ते 11 गटापेक्षा कुमारवयातील मुलांना कोविडची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे. तरीही लहान मुलांना लस दिली पाहिजे.

टीनएज मुलांची प्रतिकारक शक्ती आणि जीवशास्त्रीय घटकदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. सामान्यत: मुलांमध्ये नॉन-सार्स-कोव्ह-2 कोरोना विषाणूचे अस्तित्व असतेच. श्वसनाशी संदर्भातील आजार होतो, तेव्हा त्याचं कारण हा विषाणू हेच असते. लहान मुलांची Immunity मोठ्या पेक्षा चांगली असते. ते त्यांच्यापेक्षा जास्त फाईट करतात. असं असलं तरी अमेरिकेत लहान मुलांचे कोविडमुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे.

Advertisement

सीडीसीचा एक अहवाल असे सांगतो, शाळा सुरू असलेले देश आणि ऑनलाईन क्लास घेणाऱ्या देशांत कोविडचे प्रमाण फारसे बदलेले नाही. खबरदारी घेतली नाही तर लहान मुलांद्वारे मोठ्यांमध्ये कोविड संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. सर्वांचीच Herd Immunity सुधारत नाही, तोपर्यंत मास्क घालणं, सुरक्षित शारीरिक अंतर पाळणं यासारखे नियम गरजेचे आहेत. असं तज्ज्ञ सांगतात.

मुलांच्या लसीत वेगळेपण काय आहे ?

Advertisement

मॉडर्ना प्रौढांसाठी 100 मायक्रोग्रॅमचा एक डोस वापरते. 2 वर्षांखालील मुलांसाठी या डोसचे प्रमाण 25, 50 आणि 100 मायक्रोग्रॅम ठेवण्याबाबत चाचण्या सुरू आहेत. तर दोन वर्षांवरील वयाच्या मुलांसाठी 50 आणि 100 मायक्रोग्रॅम अशा दोन डोसची चाचणी सुरू आहे. मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी लसीचे मूल्यांकन करून योग्य लस निश्चित केली जाईल.

आतापर्यंत प्रौढ किंवा टीनएजमधील मुलांच्या सुरक्षिततेबाबत मला चिंता वाटावी असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असं डॉ. वुड म्हणतात. हे विश्लेषण अमेरिकेतील आहे.

Advertisement

मुलांना कसे सुरक्षित ठेवू शकतो?
डॉ. जेम्स वुड म्हणतात, वैद्यकीय दृष्टीकोनातून मुलांचे मानसिक आरोग्य (Mental Health) आणि इतर मुलांसह त्यांचं खेळणं हा बालपणातील एक महत्त्वाचा भाग आहे. लस न घेतलेली आणि मास्क न घालता घरात खेळणारी मुलं देखील सुरक्षित नाहीत, असं मी म्हणेन. सध्या सर्वांसाठीच जोखीम खूपच जास्त आहे. मुलांनी मैदानावर खेळावं, सायकलिंग करावं. हे करीत असताना कोरोनाबाबतीतील सर्व नियम पाळावेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement