SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ शेअर्सवर राकेश झुनझुनवालानी घेतले 400 टक्के रिटर्न्स! जाणून घ्या कोणते आहेत ते फायदेशीर शेअर्स

मुंबई : शेअर मार्केटमध्ये सध्या बूम बूम वातावरण आहे. प्रत्येकाला वाटते चांगले रिटर्न मिळत आहेत. आपलेही त्यात काही शेअर्स असते तर चांगले झाले असते. परंतु कॉमन मॅन नेमके मार्केट पडतानाच त्यात अडकतो. विविध शेअर्स असलेला पोर्टफोलिओ आपल्याकडे नसतो. किंवा कंपन्यांची योग्य निवड न केल्याने असे होते. बँकांमध्ये सर्वसाधारणपणे 7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. परंतु मार्केटमध्ये किमान 20 ते 200 टक्के 400 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स घेणारे लोक आहेत. त्यापैकीच प्रसिद्ध नाव म्हणजे राकेश झुनझुनवाला.

मार्केटमधील ओ की ठो कळत नाही, ते लोक राकेशजींना फॉलो करतात. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नेमके कोणते शेअर्स आहेत, हे पाहिलं जाते. सध्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 39 कंपन्यांच्या शेअर्स आहेत. त्यातील 22 स्टॉक्स आहेत, की त्यांनी खूप मोठी कमाई त्यांना करून दिली आहे. ते मल्टी बॅगर स्टॉक्स म्हणून ओळखले जातात.

Advertisement

त्या मल्टीबॅगर स्टॉक्सने एका वर्षात त्यांना दुप्पट पैसे मिळवून दिलेत. त्यांची बाजारातील गुंतवणुकीची किंमत 1,000,000 कोटींपेक्षा जास्त आहे. मागील एका वर्षात 4 शेअर्सनेच त्यांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तर 7 Stocksने 200 टक्क्यांपेक्षा जास्त पैसे मिळवून दिले आहेत. प्रकाश पाईप्स नावाचा एक स्टॉक्स त्यांच्याकडे आहे. मागील वर्षात त्यांना तब्बल 400 रिटर्न्स मिळवून दिले आहे. तर डीबी रियल्टीने वर्षभरात 392 टक्के गाठले. तसाच परफॉर्मन्स फर्स्टसोर्स सोल्यूशनने केला आहे. त्या शेअर्सने 346 टक्क्यांचे रिटर्न त्यांना दिले.

झुनझुनवालांचा पोर्टफोलिओ असा आहे : 

Advertisement

राकेश झुंझुनवाला यांनी aptech,रॅलिस इंडिया, एनसीसी, व्हीए टेक वबाग, डेल्टा कॉर्प, टायटन, वॉकहार्ट, फोर्टिस हेल्थकेअर, ल्युपिन फार्मा, टाटा मोटर्स आणि टाटा कम्युनिकेशन्स हे त्यांचे आवडते शेअर्स आहेत. या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे.

या कंपन्यांनी दिले रिटर्न्स : 

Advertisement

नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) च्या शेअर्समध्ये वर्षभरात सुमारे 342 टक्के, बिलकेअर लिमिटेडमधून 281 टक्के प्रकाश इंडस्ट्रीजने 238 टक्के, ऑटोलिन इंडस्ट्रीज 258 टक्के, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस 232 टक्के, अनंत राज 247 टक्के, आपटेक 210मध्ये, मंधाना रिटेल 123 टक्के, डेल्टा कॉर्प 220 टक्के, वोकार्टमधून 180 टक्के रिटर्न राकेशजींनी मिळवले.

राकेशजी हे नामांकित कंपन्यांच्या शेअर्ससोबतच छोट्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक करतात.आणि त्यातून मजबूत पैसे कमावतात. कधीकधी त्यांनाही मनासारखा पैसा मिळत नाही. परंतु त्यांच्याकडे पोर्टफोलिओमध्ये वैविध्य असते. तसा पोर्टफोलिओ जमवणे किंवा त्यांना फॉलो करणे एवढी केले तरी भरपूर कमाई होईल. त्यासाठी मित्रांनो अभ्यास गरजेचा आहे.

Advertisement

(डिस्क्लेमर : बाजारातील गुंतवणूक ही आपल्या जोखमीवर करावी. यासाठी स्प्रेडइट कोणतीही जबाबदारी घेत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगलेच)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement