SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मास्क लावून जेवू शकता, पाणी पितानाही मास्क काढायची गरज नाही, आता ते कसं? तुम्हीच वाचा…

देशात आणि जगात आता पुन्हा कोरोना व्हायरसने आपलं डोकं वर काढलं आहे. कोरोना वॅक्सीन आल्याने लोकांना थोडा दिलासा मिळाला असला तरीही मास्क हा लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे.

काही ठिकाणी लोक स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत मास्क घालून राहण्याचा प्रयत्न करत असतात तर काही ठिकाणी लोक तितके सजग दिसत नाहीत. कोरोनाच्या धोकादायक असण्याकडे लोक दुर्लक्ष करतात, काळजी घेत नाहीत. मग कोरोनाशी लढावं लागतं.

Advertisement

तुम्ही भूक लागली असता मास्क काढतात व परत लावण्याचा कंटाळा करतात, आता तुम्हीच बघा दिवसभरातून खाण्याच्या जेवढ्या वेळा आहेत अथवा पाणीही प्यायचे असो, त्या प्रत्येक वेळी आपल्याला मास्क काढावाच लागतो. पब्लिक प्लेस असो वा घरामध्ये खाण्या-पिण्याासाठी मास्क काढावाच लागतो.

तर आता ही समस्या दूर होणार आहे. आपल्या धावपळीच्या जगात वेळ कमी असतो मग तुम्ही काढलेला मास्क लावण्याचा कंटाळा करत असाल यासाठी व ही समस्या दूर करण्यासाठी मेक्सिकोच्या वैज्ञानिकाने एक खास प्रकारचं संशोधन करून मास्क डिझाईन केला आहे.

Advertisement

मेक्सिकोमधील संशोधकांनी खाताना पिताना आपण घालू शकतो असा एक मास्क डिझाईन केला आहे. तो मास्क घालून आपण केवळ आपल्या नाकाला कव्हर करू शकतो. असता यावर पुढे आणखीही काम चालू आहे.

या मास्कच्या संशोधनावर काम करणारे डॉ. अकोस्टा अल्तामिरानो म्हणाले की, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हा मास्क ‘महत्त्वपूर्ण योगदान’ देईल. या मास्कने लोकांना अधिक संरक्षण मिळवणे शक्य होईल, संशोधक आता अशा कंपनीशी चर्चेत आहेत जे अशा मास्कची निर्मिती करू शकतील”, असं ते म्हणाले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement