SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

दिपाली चव्हाण आत्महत्या: सुसाईड नोटमध्ये ‘हे’ धक्कादायक आरोप, वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ शिवकुमार यांना अटक

सुसाईड नोटमध्ये काय?

Advertisement

▪️ मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दिपाली चव्हाण या 28 वर्षीय तरूण महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात ‘अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं’, म्हटलं आहे.

▪️ उपवनसंरक्षक शिवकुमार यांनी आपल्यावर केवळ ऐकीव माहितीवर नोटीस काढायला सुरूवात केली असल्याचं दिपाली चव्हाण यांनी या पत्रात सांगितलं आहे. शिवकुमार हे वारंवार आपल्याला निंलंबित करण्याची आणि चार्जशीट दाखल करण्याची धमकी द्यायचे. त्यांनी अनेकवेळा आपल्याला सर्वांसमोर शिव्या दिल्या असल्याचंही दिपाली चव्हाण यांनी सांगितलंय.

Advertisement

▪️ दिपाली चव्हाण यांची वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात होती. गर्भवती असताना त्या मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत.

मार्केट अपडेट: इंधनाचे आजचे दर व सोने-चांदीचा आजचा भाव

Advertisement

▪️ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. परंतु, देशांतर्गत असणाऱ्या तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही.

▪️ दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर मध्ये 90.78 रुपये आणि डिझेलचा दर 81.10 रुपये इतका होता. त्याचबरोबर दिल्लीच्या तुलनेने मुंबईमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर मात्र अधिक आहे. पेट्रोलचा दर प्रति लिटर मध्ये 97.19 रुपये आणि डिझेलचा दर 88.20 रुपये इतका होता.

Advertisement

▪️ आज (दि. 26) दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 44 रुपयांची वाढ झाली आणि सोने प्रति 10 ग्रॅम 44347 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीची किंमत सुमारे 637 रुपयांनी घसरून 64110 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. बुधवारी सोन्याचा दर 44303 रुपयांवर बंद झाला होता.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता टेस्ट पास करावी लागणार

Advertisement

▪️ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामर्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माहीती दिली. त्यांनी सांगितलं की, 69 टक्के गुण मिळवणाऱ्यांनाच लायसन्स दिलं जाईल. तसंच तीन आणि चार चाकी वाहने रिव्हर्स घेताना चालकांचे वाहनांवर चांगलं नियंत्रण असणं गरजेचं आहे.

▪️ गडकरी यांनी लेखी उत्तर देताना म्हटलं की, रस्ते अपघात रोखण्यासाठी चालकाकडे कौशल्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे लायसन्सची चाचणी कठीण करण्यात आली आहे. यामध्ये रिव्हर्स गिअर असलेल्या गाड्या मागे घेणं, डावीकडे – उजवीकडे कमी जागा असताना न अडखळता गाडी मागे घेता आली पाहिजे. यासर्व बाबींवर चालकाची चाचणी घेतली जाईल असंही गडकरींनी सांगितलंय.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔥 मुंबईतील ‘या’ रुग्णालयात भीषण आग

Advertisement

🚒 माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल

😱 महापौरांकडून कारवाईचे आदेश

Advertisement

📣 नेमकी घटना काय वाचा सविस्तर : https://bit.ly/3rogkeA
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोरोना आकडेवारी: (आज 26/3/2021, सकाळी 10:28 वाजता, भारत)

▪️कन्फर्म केसेस- 1,18,46,097

Advertisement

▪️ॲक्टीव्ह रुग्ण- 4,17,823

▪️बरे झालेले रुग्ण – 1,12,62,508

Advertisement

▪️उपचार चालू – 1,60,983

UPA अध्यक्षपदावरुन कलह:

Advertisement

▪️ राऊत म्हणाले – यूपीए अध्यक्षपदाचा विषय हा दिल्लीतील आहे. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी या विषयावर काही भाष्य केले तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करता येईल. याचे उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
​​​​​​​
▪️ नाना पटोले म्हणाले होते – संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना मिळावे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या मागणीवर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली. संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच शिवसेना ही यूपीएचा भाग नाही, यामुळे राऊतांनी संबंध नसलेल्या विषयांवर भाष्य करु नये’, असं पटोले म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement