SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुंबईतील ‘या’ रुग्णालयात भीषण आग; आगीत एवढ्या जणांचा मृत्यू; महापौरांनी दिले कारवाईचे आदेश

भांडुप येथील एका रुग्णालयात आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास या रुग्णालयात आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Advertisement

मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलपर्यंत पोहोचला. सदर घटनेत 8 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईच्या महापौर घटनास्थळी कारवाईच आदेश :

Advertisement

आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये हॉस्पिटल असल्याचं पाहत आहे, या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. अशी माहितीही महापौर यांनी दिली आहे.

तर, रात्री 12.30 च्या सुमारात ड्रीम्स मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली, लेव्हल 3-4 ची ही आग असल्यानं 23 अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले. तसेच आतापर्यंत 76 रुग्णांना कोविड सेंटरला हलवण्याल आलं आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगतले.

Advertisement

दरम्यान, सदर घटनेत मृतांच्या संख्येबाबत अस्पष्टता दिसून येत असून, महापालिकेने या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तर मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement