कोरोना महामारी मुळे आरोग्य क्षेत्रावर होणारा खर्च अर्थातच जास्त प्रमाणात होत आहे. या परिस्थितीत 1 एप्रिल पासून पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. याआधीच पेट्रोल आणि डिझेल ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. असताना नेमक्या कोणत्या गोष्टी महाग होणार आणि किती पैसे मोजावे लागणार? हे आज आपण जाणून घेऊ:
एक एप्रिल पासून दुधा सहित अनेक गोष्टींच्या किमती वाढणार अशी बातमी समोर येत आहे. एसी, टीव्ही स्मार्ट फोन यासारख्या अनेक गोष्टी महाग होणार आहेत. हवाई टाक सोबतच विज बिल दरवाढ देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दूध
दुधाच्या किमती पंचावन्न रुपयापर्यंत जाव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी असताना व्यापाऱ्यांनी मात्र 3 रुपयांनी 1 एप्रिल पासून दूध दरवाढीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता दूध 49 रुपये प्रति लिटर प्रमाणे खरेदी करावी लागणार आहे.
एक्सप्रेस वे प्रवासाची किंमत वाढणार
आगरा लखनऊ द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता भाड्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 25 रुपये ही दरवाढ होणार आहे.
देशांतर्गत विमान प्रवास महागणार
देशांतर्गत विमान प्रवास करण्यासाठी देखील अतिरिक्त भाड्याची रक्कम भरावी लागणार आहे. केंद्र सरकारने घरगुती उड्डाणे 5 टक्क्यांनी भाडेवाढ करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. एक एप्रिलपासून विमान वाहतूक सुरक्षा फी देखील 200 रुपये होणार आहे, जी सध्या 160 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे करण्याकरता वाहतूक सुरक्षा फी 5.2 वरून 12 डॉलरपर्यंत होणार आहे.
टीव्ही,एसी, फ्रीज महागणार
नवीन टीव्ही घ्यायचा असेल तरीदेखील 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त किमती वाढल्याने दर उंची घटणार आहेत. 1 एप्रिलपासून 23 हजारांनी टीव्ही महागणार असून, एसी, फ्रीज, कूलर देखील 4 ते 6 टक्क्यांनी महागु शकतात.
From April 1, inflation will rise again .. Know what will be expensive and how much will be the price!