पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येबद्दल चर्चा करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. काही दिवशी हा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
काय आहेत नवे नियम?
▪️ 1 तारखेपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजेत.
▪️मॉल, चित्रपटगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीचा नियम असेल. सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.
▪️शाळा-महाविद्यालयं 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
▪️लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक संख्या अजिबात नकोय. अंत्यविधीसाठी 20 लोकांचीच परवानगी असेल. हे सगळे निर्णय नाईलाजास्तव घ्यावे लागले आहेत.
▪️खासगी रुग्णालयात सुरुवातीच्या काळात 80 टक्के बेड घेतले होते, आता 50 टक्के बेड करोनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
▪️सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू राहतील, नंतर ते बंद असतील.
पुण्यातील गेल्या 4 दिवसातील रुग्णवाढ –
21 मार्च – 2 हजार 900 नवे रुग्ण, 28 रुग्णांचा मृत्यू, 8 रूग्ण पुण्याबाहेरील.
22 मार्च – 2 हजार 342 नवे रुग्ण, 17 रुग्णांचा मृत्यू, 2 रूग्ण पुण्याबाहेरील.
23 मार्च – 3 हजार 98 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू, 9 रूग्ण पुण्याबाहेरील.
24 मार्च – 3 हजार 509 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू, 9 रुग्ण पुण्याबाहेरील.
दरम्यान, पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना 2 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या 2 एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit