SpreadIt News | Digital Newspaper

धाड टाकताच ‘तो’ 20 लाख रुपयांच्या नोटा जाळायला लागला; लाचलुचपत अधिकारीही चक्रावले, पाहा व्हीडिओ..

0

लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे (एसीबी) अधिकाऱ्यांनी या तहसीलदाराच्या घरावर छापा टाकला. त्यात राजस्थानमधील एका तहसीलदाराने थोडे थिडके नव्हे तर तब्बल 15 ते 20 लाख रुपये किंमतीच्या नोटा गॅस शेगडीवर अधिकाऱ्यांच्या समोर जाळल्याची माहिती समोर येत आहे.

अधिकारी घरामध्ये शिरण्याआधीच या तहसीलदाराला ते येण्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात माहिती मिळाल्याने त्याने ताबडतोब स्वत:ला घरात कोंडून घेतलं आणि घरातील गॅस शेगडीवर लाखो रुपयांच्या नोटा जाळत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Advertisement

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : 👉

https://www.instagram.com/p/CM3zhQhJr_MIEHHdETQLBuZNoBkakkulODqYSA0/

Advertisement

हा असा प्रकार पाहताना बराच वेळ एसीबीची टीम दरवाजा उघडण्यासाठी विनंती करत होते, मात्र त्याने सरळ सरळ दुर्लक्ष केले. या सर्व अधिकाऱ्यांनी बाहेरून पाहिले असता सर्वजण हैराण झाले, कारण तहसिलदार गॅस शेगडीवर लाखोंच्या नोटांचे बंडल जाळत होता आणि यामध्ये त्याची पत्नी सुद्धा त्याला साथ देत होती. यानंतर तहसिलदार कल्पेश जैनला अटक करण्यात आली आणि अर्धवट जळालेल्या नोटा जप्त करण्यात आल्या.

तहसीलदार कल्पेश कुमार जैन असं या तहसीलदाराचं नाव आहे. एका कंत्राटदाराकडून सरकारी कंत्राट देण्याच्या नावाखाली कल्पेशने लाच मागितल्याचा खुलासा त्यांच्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या परबत सिंहने केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक बीएल सोनी यांनी दिली होती. याच प्रकरणात तहसीलदाराला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची टीम पोहचली असता त्याने स्वत:ला कोंडून घेतलं. बुधवारी रात्री या सर्व नाट्यमय घडामोडी घडल्या.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement