SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

📉 सेन्सेक्स 600 अंकांनी आपटला, तासाभरात 1 लाख कोटींचा चुराडा

▪️सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. सरसकट लॉकडाउनचे संकट गडद बनल्याने बाजारात दबाव

Advertisement

▪️कालपासून बाजारात चौफेर गुंतवणुकीचा सपाटा सुरु आहे. सध्या सेन्सेक्स 770 अंकांनी घसरला असून तो 48409 अंकावर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 263 अंकांनी कोसळला असून तो 14283 अंकावर आहे.

😷 कोरोना: देशात आज 4 लाखांच्या पुढे जाऊ शकतो ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा (आकडेवारी वेळ – आज 25/3/2021 रोजी सकाळी 9.47 वाजता, भारत)

Advertisement

▪️कन्फर्म केसेस- 1,17,87,508

▪️ॲक्टीव्ह रुग्ण- 3,92,290

Advertisement

▪️बरे झालेले रुग्ण – 1,12,29,748

▪️उपचार चालू – 1,60,730

Advertisement

💰 पुणे: बँक डेटा चोरी प्रकरणी 13 आरोपींना जामीन मंजूर

▪️नामांकित बँकेमधील निष्क्रिय खात्यातील 216 कोटी रुपयांच्या डेटा चोरी प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या 13 आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी जामीन मंजूर केला.

Advertisement

▪️आरोपींच्या वकिलांनी आजमितीला एकही बँक फसवणुकीसंदर्भात आपणहून पुढे आली नसून त्यामुळे आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न होत नसून आरोपींना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तीवाद केला. यावर सरकारी वकिलांनी यातील काही आरोपी हे पुण्यातील रहिवासी नसून सदर आरोपींना जमीन मंजूर झाला तर ते यासारखाच दुसरा गुन्हा करतील तसेच पोलीस तपासात अडथळे आणतील असे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींचा जामीन मंजूर केला.

🏏 क्रिकेट: भारत-पाकिस्तानमध्ये 9 वर्षांनंतर टी-20 सिरीज होण्याची शक्यता

Advertisement

▪️पाक माध्यमांनुसार, या वर्षी दोन्ही संघांदरम्यान 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाऊ शकते. 2012-13 मध्ये पाकिस्तानने भारत दौऱ्यात 2 टी-20 व 3 एकदिवसीय सामने खेळले होते. त्यानंतर राजकीय वादामुळे दोन्ही देशांत द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली नाही. केवळ आयसीसी व एसीसीच्या स्पर्धेदरम्यान दोन्ही संघ समोरासमोर आले.

▪️भविष्यातील नियोजनात मालिकेसाठी निश्चित स्थान नाही. मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने म्हटले की, ते भविष्यात होणाऱ्या चर्चेसाठी तयार आहेत. या वर्षी दोन्ही संघांत मालिका होण्याचे संकेत दिले आहेत. पीसीबीच्या सूत्रांनी म्हटले की, मालिका होणार असेल, तर भारतीय संघ पाक दौऱ्यावर येईल. गतवेळी पाकने भारत दौरा केला होता.

Advertisement

🤝 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

▪️केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी ‘विचार करु’ असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

Advertisement

▪️अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “अनिल देशमुख यांनी पत्र लिहिलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये 100 कोटींच्या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. जिथे जिथे भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे”, असं म्हटलं.

💛 IPL मध्ये पहिल्यांदाच चेन्नईची जर्सी बदलली

Advertisement

▪️खांद्यावर दिसेल लष्कराचा ‘कॅमोफ्लॉज’; धोनीने केलं अनावरण, 2008 मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून पहिल्यांदाच चेन्नईची जर्सी बदलली.

▪️चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, फक्त खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती 3 स्टार आहेत, 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा किताब जिंकल्याचं हे तीन स्टार दर्शवतात.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement