घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सर्वसामान्य व्यक्ती कर्ज काढून घर घेतो. इतकी ही महत्त्वाची गोष्ट सर्वसामान्य व्यक्तीसाठी आहे. मात्र, याच कर्जाचे जर सहा हप्ते माफ होणार असं कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खूश खबर दिली आहे. तुम्ही होम लोन (Home Loan) घेतले असेल आणि जर तुम्ही ई एम आयचा (EMI) विचार करत असाल तर, तुम्हाला सहा महिन्यांचा इ एम आय या कंपनीने माफ केला आहे. होय, ही बातमी खरी आहे! ‘गृह वरिष्ठ’ योजने अंतर्गत लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने गुरुवारी ही सुविधा दिली आहे. नोकरी करणाऱ्या किंवा पेंशन धारकांसाठी ही योजना डिफॉल्ट बेनिफिट पेन्शन स्कीम मध्ये बसते.
कोणते आहेत हे इएमआय?
◼️ कंपनीच्या ज्या हप्त्यांवर सवलत देणार आहे ते हप्ते 37, 38, 73, 74, 121 आणि 122 असे आहेत.
◼️ या योजनेअंतर्गत तयार असलेली घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 6 हप्त्यावर सूट आणि बांधकाम सुरू असणाऱ्या घरांच्या हप्त्यापोटी 48 महिन्यांच्या मोरेटोरीयम सारखी सुविधा मिळणार आहे.
सीबील स्कोर
◼️ कंपनीच्या म्हणण्यानुसार, सिबिल स्कोर 700 आणि त्यावरील असणाऱ्या ग्राहकांसाठी 15 कोटी पर्यंतच्या होम लोन वर 6.90 टक्के व्याजदर सुरू होणार आहे.
कोणाला होणार फायदा?
‘गृह वरिष्ठ’ हा मार्केटमध्ये अस्तित्वात असलेला एक वेगळा होमलोन प्रॉडक्ट आहे आणि याद्वारे कर्ज घेणाऱ्याचे वय 65 वर्षांपर्यंत असू शकते असा नियम आहे म्हणजे 65 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती या योजनेद्वारे गृहकर्ज घेऊन घर खरेदी करू शकते, आणि या स्कीमचा फायदा घेऊ शकते. निवृत्तीवेतनधारकांसाठी कंपनीने एक खास होम लोन प्रॉडक्ट म्हणून या योजनेचे लॉन्चिंग केले आहे. यामध्ये कर्जाची मुदत ग्राहकाचे वय 30 आणि जास्तीत जास्त 80 होईपर्यंत ठेवली जाणार आहे.