तुमचे शिक्षण 10 वी पर्यंतच झाले आहे? आणि तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात? किंवा एखादी इंटर्नशिप करण्याची तुमची इच्छा आहे? असे असेल तर, रेल्वे तुम्हाला संधी द्यायला तयार आहे. आहे त्या शिक्षणात चांगल्या खात्यात नोकरी मिळत असेल तर कोणाला आनंद होणार नाही?
रेल्वे भरती मंडळ पश्चिम रेल्वेने दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेने जी अधिसूचना जारी केली ती इंटर्नशीपसाठी आहे.
या अधीसुचनेनुसार, एकूण 680 पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी http://wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. 5 एप्रिल रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद होणार आहे.
पात्रता
◼️या इंटर्नशीप साठी उमेदवार हा 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहा अधिक दोन या प्रणालीअंतर्गत या उमेदवाराचे शिक्षण झालेले असणे गरजेचे आहे.
◼️उमेदवारांनी NTVT किंवा SCVT मान्यताप्राप्त संस्थेशी संलग्न असणारे ITI पास झालेले असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
दहावीआणि ITI परीक्षेमध्ये सरासरी गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फ्रेशर साठी एस एस एल सी किंवा मॅट्रिक उमेदवारांकडून मिळालेल्या सरासरी गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे.
अर्जाचे शुल्क
सर्वसाधारण किंवा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्जाची फी भरावी लागणार आहे. तर आरक्षित आणि महिला उमेदवारांना मात्र, फी भरावी लागणार नाही.