मुंबई : आपल्या भारतीय संस्कृतीत आहार आणि विहाराला खूप महत्त्व आहे. ऋतुनुसार आपला आहार ठरवून दिला आहे.
सिझननुसार फळं खाल्ली तरी शरीरीला खूप फायदा होतो. आता हेच बघा ना, उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळं बाजारात येतात. ती काहीजण खातातही. परंतु असे अनेक महाभाग आहेत, ते बेमोसम फळं खाण्यावर भर देतात. त्याने शरीराची हानी होते.
उन्हाळ्यात शरीरात पाणी असले पाहिजे. त्यामुळे समतोल राखला जातो. कलिंगड सर्वांच्यात आवडीचे फळ आहे. याला हनुमान फळही काहीजण म्हणतात. म्हणूनच ते हनुमान जयंतीला खातात. त्यातील पाणी आणि फायबर पोट भरण्यासाठी उपयुक्त असते.
जे खादाडखाऊ असतात, त्यांना हे कलिंगड म्हणजेच हनुमान फळ उपयुक्त आहे. हे फळ शरीरातील विषय बाहेर काढतं, त्याच्या बियासुद्धा उपयुक्त असतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कलिंगड वेट लॉस करण्यास मदत करते. कलिंगडच्या बियांमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. बियांमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. टरबूजात 4 ग्रॅम आहे, त्यात फक्त 23 कॅलरीज असतात.
त्यात अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. मनशांतीसाठीही महत्त्वाचे आहे. शरीराला उर्जा देण्याचे काम कलिंगड करते. डॉक्टरही कलिंगड खाण्यावर भर देतात.
कलिंगड अनेक आजार पळवून लावते. बद्धकोष्ठता आणि गॅस मोठी समस्या आहे. हल्लीच्या बैठ्या जीवनशैलीमुळे हे आजार उदभवतातच. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी पडले तर अनेक समस्या उदभवू शकतात.
बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो एक उत्तम प्रकारचा डाएट आहे. त्यामुळे प्रत्येकाने कलिंगड खाल्लेच पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit