SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ पाच आकर्षक कार आहेत सध्या टॉपवर, 9 महिन्यांपर्यंत आहे वेटिंग..

भारतीय तरूणाई गाड्यांची दिवानी आहे. कट्ट्यावर, कॉलेजमध्ये, चौकात आणि सोशल मीडियातही गाड्यांबद्दल पोस्ट करीत असतात. दुचाकी असो नाही तर चार चाकी. ज्याची खरेदी करण्याची ऐपत असो नाही तर नसो. बोलण्याचा अधिकार सर्वांनाच असतो. किमान ते सामान्य ज्ञान आपल्यालाही माहिती असावं, असं प्रत्येकाला वाटतं. सध्या कोणत्या गाड्या विकल्या जातात, कोणती दुचाकी ट्रेंडिंगमध्ये आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं.

सध्या 5 गाड्यांची कमाल विक्री होतेय. विशेष म्हणजे या गाड्यांची ग्राहकांची अक्षरशः लाईन लागलीय. तर पाहूया नेमक्या कोणत्या गाड्या आहेत या…

Advertisement

महिंद्रा थार ( 9 महिने)

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने ही कार बाजारात आणली होती. यावर्षी भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्हाला महिंद्राची ही कार घ्यायची असेल तर तुम्हाला 9 महिने थांबावे लागेल. या कारसाठी 9 महिन्यांची वेटिंग आहे.

Advertisement

ह्युंदाई क्रेटा (9 महिने)

सध्याच्या काळात ही कंपनीच्या सर्वात यशस्वी गाड्यांपैकी एक आहे. आपण ही कार खरेदी करू इच्छित असल्यास आपल्याला 9 महिने थांबावे लागेल. ही कारही सेलेबल आहे.

Advertisement

मारुती अर्टिगा (8 महिने)

मारुती अर्टिगा सध्या भारताची सर्वात यशस्वी एमपीव्ही आहे. कमी किंमत देखील त्याच्या विक्रीसाठी एक कारण आहे. या कारच्या मोठ्या मागणीमुळे आपल्याला कारसाठी 8 महिन्यांपर्यंत थांबावे लागेल.

Advertisement

निसान मॅग्नाइट (6.5 महिने)

ही कार कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच केली होती. भारतात या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. या कारचे तुम्हाला सध्या 6.5 महिन्यांपर्यंत वेटींग करावे लागू शकते.

Advertisement

किआ सॉनेट (6 महिने)

किआने वर्ष 2019 मध्ये भारतात प्रवेश केला. थोड्याच वेळात ही कंपनी भारतात बरीच लोकप्रिय झाली आहे. ही कंपनीची नवीन कार आहे ज्याचा प्रतिक्षा कालावधी सध्या 6 महिने आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement