SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पॅन कार्ड लिंक न केल्यास पडेल महागात, 31 मार्चची डेडलाईन

मार्च महिना आपल्याकडे आर्थिक वर्षाचा शेवट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मार्च एंड आपल्याकडे परवलीचा शब्द झाला आहे. या महिन्यात नवीन काही ना काही येतेच किंवा मुदत तरी संपलेली असते. त्या दिवसांत लक्ष दिले नाहीतर भुर्दंड पडतो. यंदाही तसंच आहे. आता सरकारने आधार आणि पॅन कार्ड बऱ्याच व्यवहारात आवश्यक केलंय.

पॅन-आधार जोडणे: पॅनकार्डसह आधार कार्ड जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. या अंतिम मुदतीनुसार आपण पॅन आणि आधार लिंक न केल्यास आपला पॅन निष्क्रिय होईल. तसेच तुम्हाला दंडही भरावा लागेल. आयकर कायदा नवीन कलम 244 एच अंतर्गत हा दंड आकारला जाईल. मोदी सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केलेल्या वित्त विधेयक 2021च्या नुसार ही कारवाई होईल.

Advertisement

काय आहे ‘ही’ तरतूद?

▪️ प्राप्तिकर कायद्यात समाविष्ट केलेल्या नव्या तरतुदीनुसार सरकार पॅन व आधार न जोडल्याबद्दल दंडाची रक्कम ठरवेल. हा दंड 1000 रुपयांपर्यंत असेल.

Advertisement

▪️ सध्या पॅन आणि आधार जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. विद्यमान कायद्यांनुसार पॅन आणि आधार जोडलेले नसल्यास पॅन निष्क्रिय होऊ शकेल. पॅन निष्क्रिय झाले तर आर्थिक व्यवहार करता येणार नाही.

▪️ 1 एप्रिलपासून अर्थसंकल्पांचे प्रस्ताव लागू होतील. बजेटमधील तरतुदींची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होईल. 31 मार्चपर्यंत आपण हा पॅन-आधार लिंक केला नसेल तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

Advertisement

▪️ आधार मिळण्यास पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीस आयकर विवरणपत्र आणि पॅनकार्डसाठी अर्जामध्ये त्यांचा आधार क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. ज्यांनी 1 जुलै 2017 अगोदर पॅन कार्ड काढले आहे. त्यांनी हे लिंकिंग करावे लागेल. जे आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र आहेत, त्यांना पॅनला आधारशी जोडणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement