सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) माहीती दिली की, विज्ञान, गणित आणि इंग्रजीसाठी इ. 6वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धत आणि अभ्यासात आमूलाग्र बदलण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हे बदल करण्यात येतील. त्यामुळे यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी ज्ञानाधारित शिक्षणाच्या तत्त्वावर आधारित त्यांचं मूल्यमापन जाहीर केलं जाईल.
CBSE ने मुख्यतः 3 विषयांसाठी विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात बदल करायचं ठरवलं आहे. मूल्यांकन फ्रेमवर्कमध्ये वर्ग 6 ते 10 च्या विद्यार्थ्यांकरिता भारतातील विद्यमान शालेय शिक्षण प्रणाली मजबूत करणे आणि एकूणच शैक्षणिक निकालांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये इंग्लिश (वाचन), विज्ञान आणि गणित या 3 विषयांचा समावेश आहे, अशी माहीती आहे.
एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की,
यात 40 असेसमेंट डिझायनर्स, 180 लेखक व 360 मास्टर ट्रेनर अथवा मार्गदर्शकांना मॉडेल प्रश्नसंच तयार करण्यासाठी आणि आदर्श पाठ योजनांचे संकलन करण्यास प्रशिक्षण दिले जातेय.
ब्रिटन कौन्सिल आणि अल्फाप्लस यांच्यासह ब्रिटनचे ज्ञान भागीदार म्हणून भारतीय शाळांमधील सद्य शिक्षण आणि मूल्यांकन मॉडेलचे विस्तृत संशोधन आणि विश्लेषणानंतर विद्यार्थ्यांसाठीची ही मूल्यांकन पद्धती तयार केली आणि विकसित केली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी गेल्या वर्षी नवं शिक्षण धोरण मांडलं. त्याअनुषंगाने मूल्यमापन पद्धतीत फेरबदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं. प्रामुख्याने विज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या शिक्षण आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत म्हणजेच परीक्षा पद्धत्तीत बदल होणार आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात टप्प्याटप्प्याने हे बदल करण्यात येतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit