SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नगरमध्ये कोरोना रूग्ण संख्येचा विस्फोट

अहमदनगर: कोरोना गेला आहे, सगळे ओपन झाले आहे. आता काहीच होऊ शकत नाही, अशीच सर्वांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज तपासणीत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आले. अशीच स्थिती राहिली तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

कोरोना गुणाकाराला लागला आहे. आतापर्यंत पाचशेच्या घरात रोज रूग्ण सापडायचे. मात्र, कहरच झाला. सर्वाधिक रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. ४५७ रूग्ण शहरात बाधित निघाले. त्या खालोखाल संगमनेर तालुक्याचा नंबर लागतो. तेथे १४५जण निघाले. राहाता येथील संख्या (१४०) मोठी आहे. सर्वात कमी कर्जत तालुक्यात सापडले. सर्व तालुके आणि छावणी मंडळात मिळून १३३८ रूग्ण सापडले. ही या वर्षातील सर्वात मोठी रूग्ण संख्या आहे.

Advertisement

जिल्ह्यात काल दिवसभरात ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८१ हजार ४३६ आहे.

अँटीजेन चाचणीत काल १५८ जण बाधित आढळुन आले. मनपा २७,अकोले ०२, कर्जत १५, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १०, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी २५, राहाता १९, राहुरी १७, संगमनेर ०१, शेवगाव १८, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट ०१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

काल मिळालेला डिस्चार्ज
मनपा १२४, अकोले ०५, जामखेड ०६, कर्जत ११, कोपर गाव ७४, नगर ग्रामीण १९, नेवासा १७, पारनेर २५, पाथर्डी १२, राहाता ४९, राहुरी १५, संगमनेर १५, शेवगाव १३, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ५३, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:८१४३६

Advertisement

उपचार सुरू असलेले रूग्ण:४१२१

मृत्यू :११८९

Advertisement

एकूण रूग्ण संख्या:८६७४६

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Advertisement

🚘 ‘या’ 5 आकर्षक कार आहेत सध्या टॉपवर

⌛ किती महिन्यांपर्यंत आहे वेटिंग?

Advertisement

👀 जाणून घेण्यासाठी क्लिक करा
👇
https://bit.ly/3tWNvrx

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement